Bigg Boss Marathi 2 : म्हणून बिग बॉसच्या घरात ढसाढसा रडली नेहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 13:06 IST2019-07-31T12:54:14+5:302019-07-31T13:06:55+5:30
बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांचा आज ६६ वा दिवस. इतके दिवस आपल्या माणसांपासून दूर रहाणे अवघडच.

Bigg Boss Marathi 2 : म्हणून बिग बॉसच्या घरात ढसाढसा रडली नेहा
बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांचा आज ६६ वा दिवस. इतके दिवस आपल्या माणसांपासून दूर रहाणे अवघडच. त्यांच्याशी न बोलता, न भेटता, कुठल्याही प्रकारच संपर्क न ठेवता रहाण्याचा आपण विचार देखील करू शकत नाही पण हे सदस्य मोठ्या धीराने हे करत आहेत. जेव्हा इतक्या दिवसांनी आपला माणूस आपल्याला भेटतो तेव्हाचा आनंद शब्दांत व्यक्त करणे कठीण होऊन बसते. असेच काहीसे आज घरातील सदस्यांबाबत होणार आहे. बिग बॉस सदस्यांना त्यांच्या जवळच्या व्यक्तींना भेटण्याची संधी देणार आहेत वा त्यांची इच्छा पूर्ण करणार आहेत असे म्हणायला हरकत नाही. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नेहाला नचिकेत भेटायला येणार आहे. त्याला इतक्या दिवसांनंतर समोर बघून नेहाला अश्रु अनावर झाले.
“सुखा सुखी घेता घास... ठसका लागे, अडके श्वास... जो पाणी होऊनी येई त्यास सखा जिवाचा मानावा” या ओळींनी म्हणत नचिकेतनी घरामध्ये एंट्री केली... आणि सगळेच शांत झाले... नचिकेतने घरामध्ये आल्यावर नेहाला कोणते सल्ले दिले ? तिच्याशी तो काय बोलला ? त्याने इतर सदस्यांना काय सांगितले ? हे आजच्या बिग बॉस मराठीच्या भागामध्ये कळेलच..... इतर सदस्यांना कोण कोण भेटायला आले ? त्यांनी यांना काय सल्ले दिले ?