Neha Marda: बालिका वधू फेम नेहा मर्दाच्या लेकीचं थाटात झालं बारसं, पती आणि मुलीसोबतचा क्युट व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 10:02 IST2023-06-15T09:58:12+5:302023-06-15T10:02:56+5:30

नेहा लग्नाच्या 10 वर्षांनंतर आई झाली आहे.त्यामुळे तिचा आनंद गगनात मावत नाहीय.

Neha marda celebrates naming ceremon of her daughter with husband and family watch video | Neha Marda: बालिका वधू फेम नेहा मर्दाच्या लेकीचं थाटात झालं बारसं, पती आणि मुलीसोबतचा क्युट व्हिडीओ व्हायरल

Neha Marda: बालिका वधू फेम नेहा मर्दाच्या लेकीचं थाटात झालं बारसं, पती आणि मुलीसोबतचा क्युट व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री नेहा मर्दा काही दिवसांपूर्वीच एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. मुलीच्या जन्मानंर नेहा खूपच आनंदी आहे. नेहा लग्नाच्या 10 वर्षांनंतर आई झाली आहे. त्यामुळे तिचा आनंद गगनात मावत नाहीय. आता नेहाने तिच्या पती आणि कुटुंबासोबत बाळाचं केलं बारसं आहे. बारसचा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला आहे. 


नेहा मर्दाने तिच्या इंस्टाग्रामवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती तिच्या चाहत्यांना सांगत आहे की तिने नुकतेच तिच्या मुलीचं बारस केलं आहे. व्हिडिओमध्ये नेहा पती आयुष्मान अग्रवालसोबत दिसत आहे. यावेळी आयुषमान आणि नेहा खूप आनंदी दिसत आहेत. मुलाचं नाव ठेवल्यानंतर त्यांनी हा आनंद केप कापून साजरा केला. 
 

यादरम्यान नेहाने तिच्या बाळाला गुलाबी रंगाचा फ्रॉक परिधान केला होता, ज्यामध्ये ती एखाद्या परीसारखी दिसत होती. तर नेहा स्वतः राजस्थानी लूकमध्ये दिसतेय. व्हिडिओमध्ये आई झाल्याचा आनंद नेहाच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतो आहे. आपल्या बाळाला कुशीत घेऊन नेहा सुखावली आहे. 


 बालिका वधू फेम अभिनेत्री नेहा मर्दा तिच्या लग्नाच्या 10 वर्षांनंतर आई झाली आहे. तिच्या गरोदरपणात अनेक गुंतागुंत झाल्याचा खुलासा अभिनेत्रीने केला होता. नेहा मर्दा ही छोट्या पडद्यावरील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने 'डोली अरमानो की', 'बालिका वधू', 'क्यों रिश्तों में कट्टी बट्टी' आणि 'पिया अलबेला' यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.  

Web Title: Neha marda celebrates naming ceremon of her daughter with husband and family watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.