Indian Idol 12 फिनालेमध्ये झळकणार नाही नेहा कक्कर, हे आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 07:00 IST2021-08-15T07:00:00+5:302021-08-15T07:00:00+5:30
नेहा कक्कड बऱ्याच काळापासून 'इंडियन आयडॉल 12' पासून दूर असल्यामुळे तिची बहीण सोनू कक्कड शोमध्ये जज म्हणून दिसत आहे.

Indian Idol 12 फिनालेमध्ये झळकणार नाही नेहा कक्कर, हे आहे कारण
'इंडियन आयडॉल 12' दीर्घ काळापासून सोनी टीव्हीवर प्रसारित होत आहे. शोदरम्यान अनेक वादही समोर आले होते. मात्र या सगळ्यांना दूर सारत चाहत्यांसाठी हा शो आवडता शो बनला होता. आता या शोचा फिनाले रंगणार आहे. १४ तासांचा हा फिनाले होणार आहे. त्यामुळे इंडियन आयडल १२चा विजेता कोण होणार याकडेच सा-यांचे लक्ष लागले आहे.
या सगळ्यांमध्ये चाहते नेहा कक्करलाही मिस करत आहे. गेल्या काही दिवसांपासून ती या शोमधून गायबच आहे. नेहा कक्कर फिनालेमध्ये तरी उपस्थिती लावणार का याकडेच रसिकांचे लक्ष लागले आहे. नेहा कक्कड बऱ्याच काळापासून 'इंडियन आयडॉल 12' पासून दूर असल्यामुळे तिची बहीण सोनू कक्कड शोमध्ये जज म्हणून दिसत आहे.
मध्यंतरी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात शूटिंगला बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी 'इंडियन आयडॉल' ची टीम शूटिंगसाठी दमणला गेली होती, नेहाने तिथे जाण्यास नकार दिला होता. तेव्हापासून नेहा या शोपासून दूरच आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार आता तर फिनालेमध्येही ती झळकणार नसल्याचे समोर आले आहे.
नेहाला तिचे खासगी आयुष्य एन्जॉय करायचे आहे. पति रोहनप्रीत सिंहसह तिला आता क्वॉलिटी टाईम घालवायचा आहे. सततच्या शूटिंगमुळे खासगी आयुष्यात वेळ देणे शक्य होत नाही. त्यामुळे सध्या तरी रिएलिटी शोपासून लांबच राहणार असल्याचे तिने सांगितले आहे.
तर दुसरीकडे नेहा प्रेग्नंट असल्याचे बोलले जात आहे. याच कारणामुळे ती या शोपासूनही लांब असल्याचे तर्कवितर्क लावले जात आहे. मध्यंतरी तिचे फोटोही समोर आले होते. हे फोटो पाहून नेहा प्रेग्नंट असल्याचे प्रचंड चर्चा रंगल्या होत्या.तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चेवर नेहाकडून कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण आलेले नाही. इंडियन आयडल १२च्या अंतिम टप्प्यात आलेल्या शोमध्ये पवनदीप राजन, अरुणिता कांजीलाल, सायली कांबले, शण्मुखप्रिया, मोहम्मद दानिश आणि निहाल हे स्पर्धक आहेत. यापैकी 5 स्पर्धक फिनालेमध्ये एंट्री करतील.