इंडियन आयडॉलशिवाय कोणताच रिअॅलिटी शो करणार नाही नेहा कक्कर, कारण वाचून व्हाल चकीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 13:11 IST2021-03-26T12:58:13+5:302021-03-26T13:11:45+5:30
गायिका नेहा कक्करने आपल्या सुरेल स्वरांनी अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.

इंडियन आयडॉलशिवाय कोणताच रिअॅलिटी शो करणार नाही नेहा कक्कर, कारण वाचून व्हाल चकीत
सोनी एण्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील लोकप्रिय सिंगिग रिअॅलिटी शो इंडियन आयडॉलच्या १२व्या सीझनला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.या वीकएंडला इंडियन आयडॉलमध्ये होळीचा सण साजरा होणार आहे. सर्वोत्तम 10 स्पर्धक परीक्षकांसोबत जॅमिंग करताना दिसणार आहेत.
नेहा कक्कर निहाल आणि पवनदीप सोबत ‘नैना’, ‘प्यार दो प्यार लो’ आणि ‘बदरी की दुल्हनिया’ या गाण्यांवर परफॉर्मन्स देणार आहे. या परफॉर्मन्सने सगळ्यांनाच त्यांच्यासोबत ठेका धरायला भाग पाडणार आहेत. परीक्षकांनी उभे राहून, टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक केलेले पाहायला मिळणार आहे.
नेहा म्हणाली, “इंडियन आयडॉल माझ्यासाठी खूप खास आहे. इंडियन आयडॉलशिवाय अन्य कुठल्याही रिअॅलिटी शो मी करणार नाही. या कार्यक्रमाच्या टीमने खूप कष्ट घेऊन हा शो उभा केला आहे. रिअॅलिटी शोजच्या इतिहासातला हा एक आगळावेगळा शो आहे.”
गायिका नेहा कक्करने आपल्या सुरेल स्वरांनी अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. चित्रपटातील गाण्यांपासून स्टेज शोपर्यंत प्रत्येक ठिकाणी नेहा कक्कडला खूप डिमांड आहे. नेहाने 'इंडियन आयडल' सिंगिंग शोमधून तिने तिच्या करियरची सुरूवात केली होती. जेव्हा नेहा 11वीमध्ये होती. तेव्हा ती कंटेस्टेंट म्हणून या शो मध्ये आली होती. या शोमध्ये ती त्यावेळी यश मिळवू शकली नाही. तिला रिजेक्ट करण्यात आलं होतं. तरीही ती खचली नाही.