नेहा कक्कड करणार 'या' अभिनेत्याशी लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2018 16:28 IST2018-09-21T16:00:41+5:302018-09-21T16:28:19+5:30
आपल्यावर मनापासून प्रेम करणारी व्यक्ती असणे ही खूप मौल्यवान गोष्ट असते. इंडियन आयडॉल 10 ची परीक्षक नेहा कक्कड भाग्यवान आहे कारण तिला हिमांश कोहलीसारखा प्रेमकरणारा व्यक्ती मिळाला.

नेहा कक्कड करणार 'या' अभिनेत्याशी लग्न
आपल्यावर मनापासून प्रेम करणारी व्यक्ती असणे ही खूप मौल्यवान गोष्ट असते. इंडियन आयडॉल 10 ची परीक्षक नेहा कक्कड भाग्यवान आहे कारण तिला हिमांश कोहलीसारखा प्रेमकरणारा व्यक्ती मिळाला. अलीकडेच इंडियन आयडॉल 10या भारतातील सर्वात मोठ्या रिऑलिटी शोमध्ये अचानक येऊन हिमांशने नेहाला सरप्राईज दिले.
इंडियन आयडॉलमध्ये ‘शादी स्पेशल’ भागात या कार्यक्रमाच्या निर्मात्यांनी नेहाला आश्चर्याचा सुखद धक्का देण्यासाठी हिमांशला आमंत्रित केले होते. आपल्या प्रिय व्यक्तीला पाहून नेहाचा आनंद गगनात मावत नव्हता आणि ती वेड्यासारखी हसत होती. सेटवरील तो एक सुंदर क्षण होता, जेव्हा नेहाने मंचावर जाऊन जगासमोर ही कबुली दिली की तिच्यासाठी हिमांश फक्त मित्र नाही तर त्यापेक्षा जास्त आहे. तिने हे देखील सांगितले की ते दोघे पहिल्यांदा ‘आज ब्लू है पानी पानी’ या उडत्या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी भेटले होते. हे गीत नेहाने म्हटले होते. नेहा हे देखील म्हणाली की जगात हिमांश इतक्या चांगल्याप्रकारे तिला अन्य कोणी समजून घेत नाही आणि ती त्याच्याशी लग्न करण्यास तयार आहे.
नेहा कक्कड म्हणाली, “हिमांश इतक्या चांगल्या प्रकारे मला कोणीच ओळखत नाही. मी फक्त त्याच्याशीच लग्न करण्याचा विचार करू शकते. मी त्याच्या चित्रपटासाठी ‘आज ब्लू है पानी पानी’ हे गीत म्हटले होते, त्यावेळी मी हिमांशला सर्वप्रथम भेटले होते. त्या दिवसापासून आमचा झालेला हा प्रवास खूप सुंदर होता, ज्याच्या अनेक गोड आठवणी आहेत.” हिमांश कोहली म्हणाला, “प्रेम नेहमी मैत्रीपासून सुरू होते आणि नेहा माझ्यासाठी मित्रापेक्षा जास्त आहे. तिच्याकडून ही कबुली ऐकण्यासाठी मी उत्सुक होतो आणि मला वाटते आजच तो दिवस आहे.”