नेहा कक्करशी लग्न करायचंय 'या' गायकाला, कुटुंबाची घेतली भेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 12:17 IST2020-01-09T12:02:58+5:302020-01-09T12:17:48+5:30

या लग्नासाठी नेहाच्या घरच्यांनी देखील होकार दिला आहे.

Neha kakkar marriage with singer udit narayan son aditya narayan speculation family photo viral from indian idol 11 set | नेहा कक्करशी लग्न करायचंय 'या' गायकाला, कुटुंबाची घेतली भेट!

नेहा कक्करशी लग्न करायचंय 'या' गायकाला, कुटुंबाची घेतली भेट!

बॉलिवूडची गायिका नेहा कक्कर सध्या 'इंडियन आयडल'ला जज करताना दिसतेय. नेहा इंडियन आयडलच्या सेटवर रोज वेगवेगळ्या कारणांना घेऊन चर्चेत असते. सध्या 'इंडियन आयडल 11'च्या सेटवर नेहाच्या लग्नाची तयारी झाली आहे. नेहाच्या लग्नाची चर्चां तेव्हा सुरु झाली ज्यावेळी आदित्यने तिला लग्नाची मागणी घातली होती. 

इंडियन आयडलच्या सेटवर आदित्य नारायण आपले वडील उदित नारायण आणि आई दीपा नारायण आल्या होत्या. न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार 'इंडियन आयडल 11'च्या येणाऱ्या भागात उदित नारायण आणि अल्का याज्ञिक येणार आहेत. शोमध्ये उदित नारायण नेहाला मुलाच्या नावावरुन चिडवताना दिसतील. ऐवढचे नाही तर आदित्यची आई दीपा नारायण सुद्धा नेहाला सून बनवण्यासाठी तयार असल्याचे सांगणार आहे.

नेहाचे कुटुंबीयसुद्धा या लग्नासाठी तयार होणार आहे. मात्र नेहा यावर म्हणते जर ऐवढ्या लवकर लग्न केले तर मजा नाही येणार. या संपूर्ण एपिसोडचे शूटिंग पूर्ण झाले आहे.लवकर हा एपिसोड टीव्हीवर दिसणार आहे. तसे बघायला गेले तर हे लग्न शोचा एक भाग असू शकते. कारण आदित्य जो या शोचा होस्ट आहे तो नेहमी नेहाशी फ्लर्ट करताना दिसतो. त्यामुळे हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे याचा उलगडा होण्यासाठा आपल्याला थोडी वाट बघावी लागेल.     

Web Title: Neha kakkar marriage with singer udit narayan son aditya narayan speculation family photo viral from indian idol 11 set