नेहा कक्कर बनणार आई?, 'इंडियन आयडॉल' शोमधूनही आहे गायब
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 20:56 IST2021-07-21T20:55:36+5:302021-07-21T20:56:15+5:30
मागील वर्षी नेहा कक्करने रोहनप्रीत सिंगसोबत लग्न केले.

नेहा कक्कर बनणार आई?, 'इंडियन आयडॉल' शोमधूनही आहे गायब
मागील वर्षी नेहा कक्करने रोहनप्रीत सिंगसोबत लग्न केले. त्यानंतर लगेच ती प्रेग्नेंट असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यावर नेहा कक्करने मौन बाळगले होते. कारण हे तिच्या प्रदर्शित होणाऱ्या गाण्यासाठीचा प्रमोशनल स्टंट होता. त्यानंतर तिला चाहत्यांनी खूप ट्रोल केले होते. मात्र आता पुन्हा एकदा नेहा कक्कर प्रेग्नेंट असल्याची चर्चा ऐकायला मिळते आहे.
नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंगचे एकमेकांवर नितांत प्रेम आहे आणि नेहमी ते त्यांचे प्रेम सोशल मीडियावर व्यक्त करत असतात. दोघे इंस्टाग्रामवर एकमेकांचे फोटो शेअर करत असतात. त्यांच्या कॅप्शनमध्ये प्रेमाची झलक पहायला मिळाली. काही दिवसांपूर्वी ते दोघे एअरपोर्टवर स्पॉट झाले होते. काही दिवसांपासून नेहाचा ड्रेसिंग सेन्सदेखील बदलल्याचा पहायला मिळत आहे.
नेहाने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.ज्यात तिने पर्पल रंगाचा सूट परिधान केला आहे आणि रोहनप्रीतसोबत फोटो क्लिक केले आहेत.
नेहाने या फोटोत ओढणीने तिचे पोट झाकलेले आहे आणि फोटोत ती साइड पोझ देताना दिसते आहे. हे फोटो शेअर करत तिने आपल्या चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बॅकग्राउंडला डेकोरेशन दिसते आहे.
नेहा तिच्या कामाच्या बाबतीत खूप पॅशनेट आहे. मात्र बऱ्याच दिवसांपासून ती इंडियन आयडॉलच्या सेटवर दिसली नाही. ती प्रेग्नेंट असल्यामुळे तिने सुट्टी घेतली असल्याचे तर्कवितर्क लावले जात आहेत.
नेहा कक्कर मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर सैल कपडे परिधान करताना दिसते आहे. तसेच रोहनप्रीतचा हात पकडून येताना जाताना दिसते आहे. तिचा हा अंदाज पाहून चाहत्यांनादेखील ती लवकरच खुशखबरी देणार असल्याचे बोलले जात आहे.