'प्रतिशोध'मध्ये नीना कुळकर्णी यांची एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 16:11 IST2023-05-30T16:09:21+5:302023-05-30T16:11:07+5:30

Neena kulkarni: 'प्रतिशोध' या मालिकेत अभिनेता अमोल बावडेकर ममता ही मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. यामध्येच आता नीना कुळकर्णी यांची एन्ट्री होणार आहे.

Neena Kulkarni's entry in new serial Pratishoda | 'प्रतिशोध'मध्ये नीना कुळकर्णी यांची एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका

'प्रतिशोध'मध्ये नीना कुळकर्णी यांची एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका

छोट्या पडद्यावरील सोनी मराठी या वाहिनीवरील मालिकांची प्रेक्षकांमध्ये कायमच चर्चा रंगत असते. बऱ्याचदा या वाहिनीवरील मालिका त्यांच्या आशयघन विषयांमुळे चर्चेत येत असतात. त्यातलीच एक मालिका म्हणजे प्रतिशोध'- झुंज अस्तित्वाचा. या मालिकेच्या माध्यमातून पहिल्यांदाच एक महत्त्वाचा मुद्दा हाताळण्यात आला आहे. या मालिकेत आता अभिनेत्री नीना कुळकर्णी यांची एन्ट्री होणार आहे.
  
'प्रतिशोध' या मालिकेत अभिनेता अमोल बावडेकर ममता ही मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. आई आणि मुलगी यांच्या खास नात्यावर भाष्य करणारी ही मालिका असून तृतीयपंथी आई आणि दिशा नावाची मुलगी यांचं नातं आणि त्यांचा संघर्ष याची कहाणी या मालिकेतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.  यामध्येच आता नीना कुळकर्णी यांची एन्ट्री होणार असून त्या महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.

या मालिकेत शर्मिष्ठा वर्धे या नव्या भूमिकेची एन्ट्री झाली आहे. शर्मिष्ठा वर्धे यांच्या भूमिकेत अभिनेत्री नीना कुळकर्णी पाहायला मिळताहेत. निरनिराळ्या मालिकांतून आपल्या भेटीस येणाऱ्या नीना कुळकर्णी प्रतिशोधमध्ये आता वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 
दरम्यान, शर्मिष्ठा वर्धे असं त्यांच्या व्यक्तिरेखेचं नाव असून त्यांच्या येण्याने दिशा आणि शंतनू यांच्या नात्यात काय अडचणी येणार, हे आता पाहण्यासारखं असेल. शर्मिष्ठा वर्धे या वकील असण्यासोबतच शंतनूच्या आई आहेत. मालिकेत सुरुवातीपासून शंतनूची आई म्हणजे शर्मिष्ठा वर्दे यांचा उल्लेख आला आहे. शंतनूने वकिलीचा अभ्यासही आपल्या आईकडून प्रेरणा घेऊनच केला आहे. त्यांच्या येण्याने मालिकेत आता काय वेगळी वळणं येणार हे पाहण्याजोगं असेल. 
 

Web Title: Neena Kulkarni's entry in new serial Pratishoda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.