'बिग बॉस'मधून बाहेर गेल्यावर काय होतं? नीलम गिरीने केला मोठा खुलासा, म्हणाली- "आम्हाला १५-२० मिनिटं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 15:33 IST2025-11-14T15:30:09+5:302025-11-14T15:33:21+5:30
'बिग बॉस १९'मधून बाहेर पडल्यानंतर नीलम गिरीने याविषयी मोठा खुलासा केला आहे. काय म्हणाली?

'बिग बॉस'मधून बाहेर गेल्यावर काय होतं? नीलम गिरीने केला मोठा खुलासा, म्हणाली- "आम्हाला १५-२० मिनिटं..."
'बिग बॉस १९' हा शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. सलमान खान पुन्हा एकदा या शोचं सूत्रसंचालन करत आहे. सलमान खान त्याच्या खास शैलीत पुन्हा एकदा 'बिग बॉस १९' गाजवतोय. भारतातील विविध भाषांमध्ये 'बिग बॉस' सुरु आहे. 'बिग बॉस'मधील अनेक गोष्टी आपल्याला माहित नसतात. जेव्हा 'बिग बॉस'मधून एक स्पर्धक घराबाहेर पडतो तेव्हा काय होतं? याचा खुलासा नीलम गिरीने केलाय. 'बिग बॉस १९'मधून नीलम गिरी बाहेर पडली, त्यावेळी तिने हा खुलासा केलाय.
'बिग बॉस'मधून बाहेर पडल्यावर स्पर्धकासोबत काय होतं?
एका मुलाखतीत नीलम गिरीने घराबाहेर पडल्यावर काय घडतं, हे सांगितलं. ज्यामुळे अनेक वर्ष बंदिस्त असलेलं रहस्य उघड झालंय. बिग बॉसमधून एखादा स्पर्धक जेव्हा घराबाहेर पडतो तेव्हा आपण त्याला दाराबाहेर जाताना पाहतो. पण पुढे त्याच्यासोबत काय होतं? याविषयी नीलम गिरी म्हणाली, ''आमचं एविक्शन झाल्यावर आम्हाला १५-२० मिनिटं दिली जातात. त्यावेळी आम्हाला आमच्या वस्तू पॅक करुन घ्यायला सांगतात. बिग बॉसमधील सह-स्पर्धकांना पुन्हा भेटण्याची संधी दिली जाते. त्यानंतर आम्हाला जायला सांगतात.''
पुढे नीलम म्हणाली, '' त्यानंतर आम्ही ऑफिसमध्ये जातो आणि बिग बॉसची टीम आम्हाला भेटून आमच्याशी बोलते. त्यानंतर तासाभरात सर्व सामान आम्हाला मिळतं. पुढे त्याच रात्री आम्हाला घरी सोडण्यात येतं.'' अशाप्रकारे नीलम गिरीने खुलासा केला. नीलम गिरीने 'बिग बॉस १९'मध्ये तिच्या खेळाने प्रेक्षकांमध्ये चांगलं स्थान निर्माण केलं. परंतु कमी मतं मिळाल्याने 'बिग बॉस १९'मधून नीलमला बाहेर जावं लागलं. नीलम एक भोजपुरी अभिनेत्री आणि मॉडेल आहे. नीलमने खुलासा केल्याने स्पर्धकांसोबत एविक्शन झाल्यावर काय घडल, याचा खुलासा झालाय.