'बिग बॉस १७'च्या घरामधून 'हा' सदस्य पडला बाहेर; अंकिता आणि अभिषेकला अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 19:18 IST2023-11-20T19:16:02+5:302023-11-20T19:18:25+5:30

यंदाच्या पर्वात पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस' घरातील स्पर्धकांना मोठे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत.

Navid Sole Evicted From The Salman Khan Show Bigg Boss 17 | 'बिग बॉस १७'च्या घरामधून 'हा' सदस्य पडला बाहेर; अंकिता आणि अभिषेकला अश्रू अनावर

'बिग बॉस १७'च्या घरामधून 'हा' सदस्य पडला बाहेर; अंकिता आणि अभिषेकला अश्रू अनावर

'बिग बॉस १७' पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. छोट्या पडद्यावरील अतिशय वादग्रस्त असला तरीदेखील हा शो तितकाच लोकप्रियही आहे. यंदाच्या पर्वात पहिल्या दिवसापासूनच 'बिग बॉस' घरातील स्पर्धकांना मोठे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. आता एक मोठे अपडेट समोर आले आहे. बिग बॉसच्या घरातून एक सदस्य बाहेर पडला आहे. 

गेल्या आठवड्यात कोणत्याही स्पर्धकांना बाहेर काढण्यात आले नव्हते, परंतु आता या शोमध्ये आठवड्याच्या मध्यावर  मतदानाच्या आधारे नव्हे तर कुटुंबातील सदस्यांच्या निर्णयावर एका स्पर्धकाला बाहेर काढण्यात येणार आहे. यासाठी विकी जैन, अरुण, सनी (तहलका), फिरोजा (खानझादी) आणि सना यांनी मिळून बिग बॉसला 3 जणांची नावे दिली. 

आता बिग बॉसच्या फॅन पेज द खबरीनुसार, या आठवड्यात ज्या सदस्याचा प्रवास संपणार आहे तो दुसरा कोणी नसून नावेद सोल आहे. आता बिग बॉस नावेद सोलला घरातून बाहेर काढणार का, हे पुढच्या एपिसोडमध्ये कळेल. नावेद सोल फार्मासिस्ट आहे. याशिवाय तो अनेक रिअॅलिटी टीव्ही शोचा भाग राहिला आहे. नावेद सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. 

नावेद सोल व्यतिरिक्त, या आठवड्यात 4 लोकांना देखील शोमधून बाहेर काढले जाणार आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, निर्माते आता शोमध्ये सतत ट्विस्ट आणणार आहेत. या आठवड्यात, 5 लोकांना शोमधून बाहेर काढले जाईल, त्यानंतर काही नवीन वाईल्ड कार्ड स्पर्धक शोमध्ये प्रवेश करतील. रिपोर्टनुसार, पूनम पांडे आणि बांगलादेश महिला क्रिकेट संघाची खेळाडू जहांआरा आलमसह  इतर काही सेलिब्रिटींशी निर्मात्यांनी संपर्क साधला आहे. आता बिग बॉसच्या घरात नेमके काय बदल होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
 

Web Title: Navid Sole Evicted From The Salman Khan Show Bigg Boss 17