'ज्ञानेश्वर माउली' मालिकेत नंदेश उमप यांची एन्ट्री; साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 18:22 IST2023-03-10T18:20:43+5:302023-03-10T18:22:07+5:30

Dnyaneshwar Mouli: या मालिकेतून सध्या संतांची मांदियाळी अनुभवायला मिळत आहे.

Nandesh Ump entry in Dnyaneshwar Mouli serial | 'ज्ञानेश्वर माउली' मालिकेत नंदेश उमप यांची एन्ट्री; साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

'ज्ञानेश्वर माउली' मालिकेत नंदेश उमप यांची एन्ट्री; साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

सोनी मराठीवरील 'ज्ञानेश्वर माउली' या मालिकेतून संतांची परंपरा उलगडली जात आहे. त्यामुळे अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. माउली आणि त्यांची भावंडं, यांचे चमत्कार, रेड्यामुखी वेद, सार्थ श्रीज्ञानेश्वरी, विश्वरूप दर्शन, पसायदान हे सारं काही प्रेक्षकांना विशेष भावलं आहे.  यात सध्या संतांची मांदियाळी अनुभवायला मिळत असतानाच आता आणखी एका संत महाराजांचा प्रवेश होणार आहे. विशेष म्हणजे ही भूमिका संगीत क्षेत्रातील एक दिग्गज कलाकार साकारणार आहेत.
      
संतांच्या या प्रवासाची सुरुवात संत कान्होपात्रा यांच्या येण्याने झाली. संत चोखामेळा यांची कथाही प्रेक्षकांना पाहायला मिळाली आणि प्रेक्षकांना ती भावली. संत नामदेव यांनीही प्रेक्षकांना भुरळ पडली. आता मालिकेत संत सेना महाराज यांचा प्रवेश होणार आहे. माउली आणि नामदेव यांची भेट कशा प्रकारे होणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे. 

या मालिकेत संत सेना महाराज यांची भूमिका नंदेश उमप साकारणार आहेत. नंदेश उमप हे संगीत क्षेत्रातील नावाजलेलं व्यक्तिमत्त्व आहे. नंदेश उमप यांनी या भूमिकेसाठी विशेष मेहनत घेतली आहे.

दरम्यान,  संत सेना महाराज हे न्हावी समाजाचे प्रमुख, ते आळंदीजवळून प्रवास करताहेत हे समजताच माउली आणि त्यांची भावंडं त्यांना भेटण्यासाठी म्हणून जातात. माउली आणि त्यांच्या भावंडांना संत सेना महाराज यांना भेटण्याची फार उत्सुकता आहे.त्यामुळेच आता माउली आणि  संत सेना महाराज यांची भेट कशी असेल, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.  
 

Web Title: Nandesh Ump entry in Dnyaneshwar Mouli serial