Namrata Sambherao : हास्यजत्रेच्या 'लॉली'चं वेबसिरीजमध्ये पदार्पण, नम्रता संभेरावच्या हटके भूमिकेचीच चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 11:59 IST2023-06-02T11:57:35+5:302023-06-02T11:59:02+5:30
बोल्ड डायलॉग्स, हटके स्टोरी अशी डार्क कॉमेडी वेबसिरीज प्लॅनेट मराठी घेऊन आलंय.

Namrata Sambherao : हास्यजत्रेच्या 'लॉली'चं वेबसिरीजमध्ये पदार्पण, नम्रता संभेरावच्या हटके भूमिकेचीच चर्चा
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधून सर्वांना खळखळून हसवणारी 'लॉली' आता वेबसिरीजमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. प्लॅनेट मराठीच्या 'गेमाडपंथी' या वेबसिरीजमध्ये नम्रता संभेराव (Namrata Sambherao) झळकणार आहे. आजपासून वेबसिरीज प्रदर्शित झाली आहे. याचा ट्रेलर आला तेव्हाच प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. त्यामुळे आता संपूर्ण सिरीजकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
बोल्ड डायलॉग्स, हटके स्टोरी अशी डार्क कॉमेडी वेबसिरीज प्लॅनेट मराठी घेऊन आलंय. प्रत्येक कलाकाराची स्वतंत्र अशी महत्वाची भूमिका दिसून येत आहे. नम्रता संभेराव यामध्ये मुस्लिम महिलेच्या भूमिकेत आहे. हैदराबादी महिलेची तिची भूमिका आहे ज्यात ती बुरख्यात दिसत आहे. तर तिच्यासोबत अभिनेता उपेंद्र लिमयेही मुख्य भूमिकेत आहे.
'गेमाडपंथी' ही वेबसिरीज संतोष कोल्हे यांनी दिग्दर्शित केली आहे. नम्रता संभेराव, उपेंद्र लिमयेसह अभिनेता प्रणव रावराणे आणि अभिनेत्री पूजा कातुर्डे देखील मुख्य भूमिकेत आहेत. आधी कॉमेडी आणि नंतर डार्क होत जाणाऱ्या या वेबसिरीजचा ट्रेलर खिळवून ठेवणारा आहे. तर आजपासून संपूर्ण वेबसिरीज रिलीज झाली आहे.