बाळाला जन्म देताना 'या' अभिनेत्याच्या पत्नीची झाली होती अशी हालत; शेअर केला डिलिव्हरी रुमचा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 18:48 IST2022-04-24T18:47:10+5:302022-04-24T18:48:35+5:30
Nakuul mehta wife : सध्या जानकीची ही जुनी पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये तिने ऑपरेशन थिएटरमधील काही फोटो शेअर केले आहेत.

बाळाला जन्म देताना 'या' अभिनेत्याच्या पत्नीची झाली होती अशी हालत; शेअर केला डिलिव्हरी रुमचा फोटो
'इश्कबाज' फेम अभिनेता नकुल मेहता (Nakuul Mehta) आणि त्याची पत्नी जानकी पारेख (Jankee Parekh) सध्या त्यांच्या लहान बाळाला सूफीला जास्तीत जास्त वेळ देत आहेत. त्यामुळे ही जोडी सध्या पॅरेंटिंगमध्ये बिझी आहे. अनेकदा नकुल आणि जानकी दोघंही सोशल मीडियावर त्यांच्या बाळाचे फोटो शेअर करत असतात. यात सध्या जानकीची एक पोस्ट चर्चेत आली आहे. जानकीने इन्स्टावर एक जुना फोटो शेअर केला आहे. यामध्येच डिलीव्हरीच्या वेळी तिची कशा पद्धतीने अवस्था झाली होती हे तीने काही फोटो शेअर करत सांगितलं आहे. सोबत एक पोस्टही शेअर केली आहे.
जानकीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिच्या प्रेग्नंसीपासून ते बाळाच्या जन्मापर्यंत तिच्या कोणकोणते बदल होत गेले, तिची डिलीव्हरी कशा पद्धतीने झाली हे तिने सांगायचा प्रयत्न केला आहे.
भलेही मला यापूर्वी लेबर पेन, नॉर्मल डिलीव्हरीचा अनुभव नव्हता. परंतु, त्या काळात माझ्या सोबतीने मला ज्या पद्धतीने साथ दिली, माझा हात धरुन ठेवला. ज्या पद्धतीने माझं पोट फाडून त्यातून एक नवा जीव जन्माला आला, हे सगळे अनुभव आमच्यासाठी इतकी सुंदर आणि आनंदाने भरलेले होते. की याची तुलना मी कोणत्याच गोष्टीसोबत करु शकत नाही. मी हे सगळं काही नकुलच्या डोळ्यातून पाहिलं आहे. मी खूप भाग्यवान आहे. माझे डॉक्टर द्रुपती डधिया यांच्यापासून ते माझे एनेस्थेटिस्ट आणि सूप्या हॉस्पिटलच्या सगळ्या नर्स सगळ्यांनीच माझी खूप काळजी घेतली, अशी पोस्ट जानकीने शेअर केली.
दरम्यान, सध्या जानकीची ही जुनी पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये तिने ऑपरेशन थिएटरमधील काही फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे सध्या तिची ही पोस्ट वाऱ्यासारखी व्हायरल होत आहे. इतकंच नाही तर अनेकांनी तिच्यावर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षावही केला आहे.