Video : चिमुकल्या मायराचे 'व्हॉट झुमका' वर डान्स रील, थेट करण जोहरनेही केलं रिपोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 16:27 IST2023-07-24T16:27:05+5:302023-07-24T16:27:57+5:30

चिमुकल्या मायराने करण जोहरचंही वेधलं लक्ष

myra vaikul dance reel on what jhumka karan johar also reposted it on his social media | Video : चिमुकल्या मायराचे 'व्हॉट झुमका' वर डान्स रील, थेट करण जोहरनेही केलं रिपोस्ट

Video : चिमुकल्या मायराचे 'व्हॉट झुमका' वर डान्स रील, थेट करण जोहरनेही केलं रिपोस्ट

करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमातील 'व्हॉट झुमका' हे गाणं प्रचंड लोकप्रिय होत आहे. गाण्याचं प्रमोशनही जोरदार सुरु आहे. 'झुमका  गिरा रे बरेली के बजार मे' या जुन्या आयकॉनिक गाण्यातं हे रिक्रिएटेड व्हर्जन आहे. आलिया भट आणि रणवीर सिंगवर गाणं चित्रित करण्यात आलंय. या गाण्यावर अनेक नेटकरी रील व्हिडिओ पोस्ट करत आहेत. मराठीतील बालकलाकार सर्वांची लाडकी मायरा वायकुळनेही (Myra Vaikul) गाण्यावर रील केलं असून करण जोहरने (Karan Johar) तिचा व्हिडिओ शेअर केला आहे.

मायरा वायकुळ नेहमी ट्रेंडिंग गाण्यावर रील करत असते. इतक्या कमी वयातही तिची प्रचंड लोकप्रियता आहे. मायराच्या व्हिडिओला चाहतेही खूप एन्जॉय करतात. हिंदी गाण्यांवर व्हायरल होत असलेले रील्स मायरा न चुकता फॉलो करते. तिची आई सोशल मीडियावर तिचे रील्स पोस्ट करत असते. नुकतंच मायराने 'व्हॉट झुमका' या ट्रेंडिंग गाण्यावर डान्स रील केले.  लाल टॉप, काळी सलवार आणि ओढणी अशा लुकमध्ये मायराने गाण्यावर डान्स रील केले. 

मायराचा हा व्हिडिओ करण जोहरनेही त्याच्या स्टोरीवर रिपोस्ट केला आहे. तसंच करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शननेही त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन तिचे रील पोस्ट केले आहे. त्यामुळे चिमुकल्या मायराची दखल बॉलिवूडनेही घेतली आहे. आता मायरा नंतर बॉलिवूडच्या कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसली तर आश्चर्य वाटायला नको.

Web Title: myra vaikul dance reel on what jhumka karan johar also reposted it on his social media