लग्नाबद्दल माझे विचार मिष्टीसारखेच - रिया शर्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 15:44 IST2019-03-15T15:43:39+5:302019-03-15T15:44:01+5:30

आपल्या ताज्या आणि पुरोगामी कथानकामुळे ‘स्टार प्लस’वरील ‘ये रिश्ते है प्यार के’ या मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे.

My thoughts about marriage are like Mithi - Riya Sharma | लग्नाबद्दल माझे विचार मिष्टीसारखेच - रिया शर्मा

लग्नाबद्दल माझे विचार मिष्टीसारखेच - रिया शर्मा

आपल्या ताज्या आणि पुरोगामी कथानकामुळे ‘स्टार प्लस’वरील ‘ये रिश्ते है प्यार के’ या मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. या मालिकेत नायिका मिष्टीची भूमिका अभिनेत्री रिया शर्मा साकारीत असून यात ती आजवर कधी न पाहिलेल्या रूपात प्रेक्षकांना दिसणार आहे. आपल्या या व्यक्तिरेखेशी एकरूप झालेल्या रियाचे लग्नासंबंधीचे विचार मिष्टीच्या विचारांसारखेच आहेत.

रिया इतक्यातच लग्न करणार आहे की नाही, याची आपल्याला कल्पना नसली, तरी विवाहाबद्दल तिची मते आणि विचार हे मिष्टीच्या विचारांशी तंतोतंत जुळणारे आहेत. ती म्हणाली, “लग्नाबद्दल माझे विचार मिष्टीसारखेच आहेत. समोरची व्यक्ती ही तुमची जीवनसाथी बनण्यास लायक आहे, याबद्दल तुमच्या मनाची खात्री पटली, तरच तुम्ही त्याच्याशी विवाहबद्ध होणे चांगले. सुरुवातीला तुमचा जोडीदार आपल्या आणि कुटुंबियांबद्दलच्या चांगल्या गोष्टीच तुमच्यासमोर सादर करीत असतो; पण नंतर त्यांच्या स्वभावाची दुसरी बाजू सामोरी येते.”


ये रिश्ता क्या कहलाता है!’ या सर्वाधिक काळ सुरू असलेल्या मालिकेच्या कथानकावर आधारित असलेली ही मालिका तिच्या कथानकाला वेगळ्या वळणावर नेण्याचे काम ‘ये रिश्ते है प्यार के’ या मालिकेतील पुढील पिढीचे नायक करतील. त्यातून विवाह, नातेसंबंध आणि कौटुंबिक बंध यांवर नवा प्रकाश टाकला जाईल. रिहाच्या व्यक्तिमत्त्वाने आणि अभिनय कौशल्यामुळे तिला मिष्टीची भूमिका रंगविताना पाहणे नक्कीच रंजक ठरेल. १८ मार्चपासून पाहा ‘ये रिश्ते है प्यार के’ सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता फक्त ‘स्टार प्लस’वर पाहता येणार आहे.

Web Title: My thoughts about marriage are like Mithi - Riya Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.