'माय पार्टनर...'; तेजश्री प्रधानची बबड्यासाठी केलेली स्पेशल पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 11:13 IST2021-12-23T11:13:08+5:302021-12-23T11:13:53+5:30
तेजश्री प्रधानने आशुतोष पत्कीसाठी एक स्पेशल पोस्ट शेअर केली. या पोस्टमुळे या दोघांची जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

'माय पार्टनर...'; तेजश्री प्रधानची बबड्यासाठी केलेली स्पेशल पोस्ट चर्चेत
'अग्गंबाई सासुबाई' (Aggabai Saasubai) या मालिकेतून शुभ्रा आणि बबड्या ही जोडी घराघरात पोहचली. आता ही मालिका संपून बराच काळ उलटला आहे. तरीदेखील ही जोडी चर्चेत येत असते. मात्र ही जोडी आता रिलपेक्षा रिअल लाइफमध्ये चर्चेत आली आहे. शुभ्राची भूमिका अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) हिने साकारली होती तर बबड्याची भूमिका आशुतोष पत्की (Ashutosh Patki) ने निभावली होती. दरम्यान तेजश्री प्रधानने आशुतोष पत्कीच्या वाढदिवसानिमित्त एक स्पेशल पोस्ट शेअर केली. या पोस्टमुळे या दोघांची जोडी पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
तेजश्री प्रधानने आशुतोष पत्की सोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले की, वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या कामातील पार्टनर....क्राईम पार्टनर....क्रिएटिव्हीटी....फाईट..लाफटर...गॉसिप..जवळ जवळ सर्वच चांगल्या वाईट गोष्टींमध्ये तू माझा पार्टनर आहेस. तेजश्रीच्या या पोस्टनंतर आशुतोष पत्कीवर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.
तेजश्रीच्या वाढदिवशीही आशुतोषने तिच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. तो खूप व्हायरल झाला होता. त्यानंतर ते दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्या पोस्टमध्ये आशुतोषनं तेजश्रीला तिचा भूतकाळ विसरून पुढे जाण्याचा सल्ला दिल्यामुळे या चर्चेला उधाण आले. मात्र तेजश्री प्रधानने याविषयी एका मुलाखतीमध्ये सांगतिले होते की, आमच्या दोघांमध्ये फक्त चांगली मैत्री आहे. आशुतोष हा माझा खूपच जवळचा मित्र आहे आणि म्हणूनच त्याने तो फोटो माझ्या वाढदिवसानिमित्त शेअर केला होता.