धक्कादायक! 'माझ्या जिवाला धोका आहे, हत्येचा कट रचला जातोय..' गायिका वैशाली माडेची खळबळजनक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 12:26 IST2022-02-18T12:11:56+5:302022-02-18T12:26:42+5:30
महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका वैशाली माडे (Vaishali Made)तिच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

धक्कादायक! 'माझ्या जिवाला धोका आहे, हत्येचा कट रचला जातोय..' गायिका वैशाली माडेची खळबळजनक पोस्ट
महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका वैशाली माडे (Vaishali Made)तिच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चेत आली आहे. वैशालीने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक खळबळजनक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने आपल्या जीवाला धोका असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. याबाबत आपण दोन दिवसांनंतर पत्रकार परिषद घेऊन संबंधीत प्रकरणाबाबत बोलणार असल्याचे तिने सांगितले आहे.
'काही लोकांकडून माझ्या जीवाला धोका आहे. माझ्या हत्येचा कट रचला जात आहे. दोन दिवसांनंतर पत्रकार परिषद घेऊन मी याचा गौफायस्फोट करणार आहे. आज मला तुमच्या सपोर्टची गरज आहे'. असे या पोस्टमध्ये वैशालीने लिहिले आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय. चाहत्यांनी तिला सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे हे आता आपल्याला वैशालीने पत्रकार परिषद घेतल्यानंतरच कळेल.
वैशाली माडे 2008 मध्ये 'झी मराठी'च्या 'सा रे ग म प'च्या पर्वाच्या विजेत्या ठरल्या आहेत आणि हाच त्यांच्या आयुष्याचा 'टर्निंग पाँईंट' ठरला. त्यानंतर 'झी'च्या हिंदी 'सा रे ग म प'मध्ये ही त्यांनी आपल्या सुरेल आवाजाच्या जोरावर बाजी मारली. माडे यांचा एका सुप्रसिद्ध गायिकेपर्यंतचा प्रवास संघर्षासह अनेक चढ-उतारांचा राहिला आहे. आता त्या मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत गायिका म्हणून सुप्रसिद्ध आहेत.