'बबिता'ला आली दयाबेनची आठवण, दिशा वकानीच्या शो सोडण्यावर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 16:50 IST2024-08-02T16:49:15+5:302024-08-02T16:50:16+5:30

आपण नेहमी त्याच लोकांची आठवण काढतो जे...

Munmun Dutta reacts on Disha Vakani s exit from the show Taarak Mehta Ka Ooltah Chashma | 'बबिता'ला आली दयाबेनची आठवण, दिशा वकानीच्या शो सोडण्यावर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

'बबिता'ला आली दयाबेनची आठवण, दिशा वकानीच्या शो सोडण्यावर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतील प्रत्येक कलाकार लोकप्रिय झाला. मालिकेला सुरु होऊन तब्बल 16 वर्ष झाली आहेत. दिशा वकानीने 2017 मध्येच मालिका सोडली होती. तिच्या दयाबेन या भूमिकेने सर्वांनाच वेड लावलं होतं. तिचा आवाज, बोलण्याची स्टाईल एकदमच वेगळी होती. नुकतंच मालिकेतील बबिता म्हणजेच अभिनेत्रीने मुनमुन दत्ताने (Munmun Dutta) मुलाखतीत दिशा वकानीची आठवण काढली.

ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत मुनमुन दत्ता म्हणाली, "आपण नेहमी त्याच लोकांची आठवण काढतो जे आपल्याला सोडून गेले आहेत. शो सोडून गेलेल्यांचीही आम्हाला आठवण येते. मी दिशाला खूप मिस करते. जेव्हा केव्हा आम्ही सेटवर मजामस्ती करतो तेव्हा आम्ही म्हणतो आठवतंय का दिशा यावर असं असं म्हणाली होती. आमच्या एकत्रित अनेक आठवणी आहेत. दिशाला जेव्हा केव्हा अनोळखी लोकांचा फोन यायचा तेव्हा ती फोन उचलून वेगळ्या आवाजात बोलायची."

दिशा वकानीने 2017 मध्ये मालिका सोडल्यानंतर ती पुन्हा परतलीच नाही. ती मॅटर्निटी लीव्ह वर होती तेव्हापासून तिने कमबॅक केलेले नाही. असित मोदींनी अनेकदा त्यांच्या मुलाखतीत दिशा वकानीच्या कमबॅकविषयी वक्तव्य केले आहे. मात्र चाहत्यांना अद्याप तिच्या कमबॅकची प्रतिक्षा आहे.

Web Title: Munmun Dutta reacts on Disha Vakani s exit from the show Taarak Mehta Ka Ooltah Chashma