'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील 'या' मुख्य कलाकाराला 'बिग बॉस १९'ची ऑफर? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 11:39 IST2025-06-04T11:39:33+5:302025-06-04T11:39:56+5:30

तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील 'या' गाजलेल्या कलाकाराला मेकर्सने 'बिग बॉस १९' मध्ये सहभागी होण्याची ऑफर दिली आहे.

munmun dutta from taarak mehta ka ooltah chashmah got offer for bigg boss 19 reality show | 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील 'या' मुख्य कलाकाराला 'बिग बॉस १९'ची ऑफर? वाचा सविस्तर

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील 'या' मुख्य कलाकाराला 'बिग बॉस १९'ची ऑफर? वाचा सविस्तर

'बिग बॉस १९'ची (Bigg Boss 19) घोषणा झाली आहे. याहीवेळी सलमान खानच सीझन होस्ट करणार आहे. यंदा सीझनमध्ये कोणते सेलिब्रिटी सहभागी होणार याची चर्चा सुरु झाली आहे. काही सेलिब्रिटींना मेकर्सने अप्रोचही केलं आहे. तसंच यावेळी कोणत्याही इन्फ्लुएन्सर्सना घेणार नसल्याचं मेकर्सने स्पष्ट केलं आहे. दरम्यान 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील 'या' गाजलेल्या कलाकाराला मेकर्सने 'बिग बॉस १९' मध्ये सहभागी होण्याची ऑफर दिली आहे.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतले सगळेच कलाकार लोकप्रिय आहेत. त्यातच बबिता या भूमिकेतून मुनमुन दत्ताला (Munmun Dutta) कायमची बबिता नावानेच ओळख मिळाली. ईटाइम्स रिपोर्टनुसार, मुनमुन दत्ताला यावेळी बिग बॉससाठी अप्रोच करण्यात आलं आहे. अद्याप बबिताकडून याबाबत अधिकृत माहिती आलेली नाही. मेकर्स तिच्यासोबत चर्चा करत आहेत. विशेष म्हणजे याआधीही मुनमुनला बिग बॉसच्या ऑफर मिळाल्या आहेत. मात्र मालिकेतील कमिटमेंट्समुळे ती कधी या शोचा भाग होऊ शकली नाही. आता यंदा तरी ती या शोचा भाग होईल की नाही हे लवकरच स्पष्ट होईल.

मुनमुन दत्ता 'बबिता'च्या भूमिकेतून प्रसिद्धीझोतात आली. मालिकेत ती अय्यरच्या ग्लॅमरस पत्नीच्या भूमिकेत आहे. तर जेठालालला ती आवडत असते असंही मजेशीररित्या दाखवण्यात आलं आहे. मुनमुन दत्ता या मालिकेशिवाय फारशी कुठेही झळकलेली नाही. तसंच ती मध्यंतरी वैयक्तिक कारणांमुळेही चर्चेत होती. मालिकेतील टप्पूसोबत म्हणजेच राज उनाडकटसोबत तिच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. नंतर या केवळ अफवा असल्याचं समोर आलं होतं.

यंदा 'बिग बॉस १९' मध्ये राम कपूर आणि गौतमी कपूर ही रिअल लाईफ जोडीही दिसण्याची शक्यता आहे. सलमान खान जून महिन्याच्या शेवटी बिग बॉस १९ चा प्रोमो शूट करेल अशी चर्चा आहे.

Web Title: munmun dutta from taarak mehta ka ooltah chashmah got offer for bigg boss 19 reality show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.