कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा समय रैनाला फुल्ल सपोर्ट! म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 12:59 IST2025-02-13T12:58:32+5:302025-02-13T12:59:03+5:30

कॉमेडियन मुनव्वर फारुकीने समय रैनाला पाठिंबा दर्शवला आहे. 

Munawar Faruqu Came In Support Of Samay Raina Amid India's Got Latent Controversy | कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा समय रैनाला फुल्ल सपोर्ट! म्हणाला...

कॉमेडियन मुनव्वर फारुकीचा समय रैनाला फुल्ल सपोर्ट! म्हणाला...

Samay Raina: कॉमेडियन समय रैना सध्या त्याच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' (India's Got Latent) या शोमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या शोमध्ये परीक्षक म्हणून पोहोचलेल्या युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादियाने आईवडिलांबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली. यावरून सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.  याप्रकरणी ३० ते ४० जणांविरोधात FIR नोंदवण्यात आला आहे. या सर्व गोंधळात कॉमेडियन मुनव्वर फारुकीने (Munawar Faruqui) समय रैनाला पाठिंबा दर्शवला आहे. 

एकीकडे सर्वच समय रैनाविरोधात असताना मुनव्वर फारुकीने मात्र समयला पाठिंबा दिला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट  करत लिहिलं, "कला ही एका स्प्रिंगप्रमाणे असते. जेवढं तुम्ही दाबालं तेवढ्याच तीव्रतेने ती जोरात उठते. तुम्ही पाहात राहालं, तो खूप दमदार कमबॅक करेल", असं लिहलं. दरम्यान, फक्त मुनव्वरचं नाही तर उर्फी जावेद, राखी सावंत, अली गोनी या सेलिब्रिटींनी समय रैनाचं समर्थन करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 


दरम्यान, अश्लील वक्तव्यांमुळे समय रैना आणि रणवीर अलाहाबादियावर एफआयआर दाखल झाले आहेत. महिला आयोगानेही समन्स पाठवले आहेत. इतकंच नाही तर समयचे गुजरातचे सगळे लाईव्ह शोज रद्द झाले आहेत. समय रैना हा एक लोकप्रिय भारतीय स्टँडअप कॉमेडियन आणि युट्यूबर आहे.  तो २७ वर्षांचा असून मूळचा जम्मूचा आहे. कॉमेडी व्यक्तिरिक्त समय रैना बुद्धिबळ देखील खेळतो.   'इंडियाज गॉट लेटेंट'  शोमुळे तो प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला. समयच्या युट्यूबवर ७० लाख सब्सक्रायबर्स असून इन्स्टाग्रामवर ६० लाख फॉलोअर्स आहेत. समय रैनाच्या या शोच्या प्रत्येक भागाला लाखो व्ह्यूज मिळालेले होते. मात्र आता समयच्या या निर्णयानंतर आता हे प्रकरण शांत होणार की पुढील कारवाई सुरुच राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Web Title: Munawar Faruqu Came In Support Of Samay Raina Amid India's Got Latent Controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.