कार्तिकीच्या प्रेग्नंसीविषयी कळताच मुग्धाने दिली 'ही' रिॲक्शन; कमेंट होतीये व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 11:00 IST2024-03-30T10:59:01+5:302024-03-30T11:00:00+5:30
Kartiki gaikwad: कार्तिकीने इन्स्टाग्रामवर तिच्या डोहाळजेवणाचे फोटो शेअर केले आहेत.

कार्तिकीच्या प्रेग्नंसीविषयी कळताच मुग्धाने दिली 'ही' रिॲक्शन; कमेंट होतीये व्हायरल
सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय गायिका कार्तिकी गायकवाड चर्चेत येत आहे. 'सारेगमप लिटिल चॅम्प'च्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली कार्तिकी लवकरच आई होणार आहे. नुकताच तिच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम पार पडला. कार्तिकीच्या डोहाळजेवणाचे फोटो समोर आल्यानंतर सेलिब्रिटींनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. यामध्येच कार्तिकीची जवळची मैत्रीण मुग्धा वैशंपायन (mugdha vaishampayan) हिने सुद्धा कमेंट करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
कार्तिकीने इन्स्टाग्रामवर तिच्या डोहाळजेवणाचे अनेक फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने “ओटीभरण कार्यक्रमातील काही खास क्षण” असं कॅप्शन दिलं आहे. तिचे हे फोटो पाहिल्यावर प्रियांका बर्वेपासून प्राजक्ता गायकवाडपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यात मुग्धानेही खूप आनंद झाल्याचं म्हटलं आहे.
''खूप खूप खूप...आनंद झालाय कार्तिकी'', असं म्हणत मुग्धाने तिचा आनंद व्यक्त केला आहे. मुग्धाच्या कमेंटवर कार्तिकीनेही तिचे आभार मानले आहेत. दरम्यान, कार्तिकी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. तसंच ती कलाविश्वातही सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. अनेक मालिका, सिनेमांसाठी तिने पार्श्वगायन केलं आहे.