Siddharth Shukla : भोजपुरी गाण्यात सिद्धार्थ शुक्लाची झलक; चाहते झाले भावुक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 03:22 PM2022-12-08T15:22:09+5:302022-12-08T15:24:06+5:30

भोजपुरी अभिनेत्री 'मोनालिसा'ने एक जुना डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे जो बघून चाहते सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत भावुक झाले आहेत.

monalisa-bhojpuri-song-resham-ka-rumal-fans-rescognises-siddharth-shukla-in-the-song | Siddharth Shukla : भोजपुरी गाण्यात सिद्धार्थ शुक्लाची झलक; चाहते झाले भावुक

Siddharth Shukla : भोजपुरी गाण्यात सिद्धार्थ शुक्लाची झलक; चाहते झाले भावुक

googlenewsNext

भोजपुरी अभिनेत्री 'मोनालिसा'ला तुम्ही गाण्यांमध्ये बघितलेच असेल. तिचे लुक्स, डान्स यामुळे ती नेहमीच चाहत्यांना इंप्रेस करते. कधी रील्स, व्हिडिओमधून तर कधी तिचे फोटो सोशल मीडियावर धुमाकुळ घालत असतात. नुकताच तिने एक जुना डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे जो बघून चाहते सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत भावुक झाले आहेत. आता सिद्धार्थ शुक्ला ची आठवण यायचे कारण काय तर या गाण्यात चक्क सिद्धार्थ शुक्ला दिसत आहे. 

'रेशम का रुमाल' गाण्यात सिद्धार्थची झलक 

गायिका इला अरुण यांच्या 'रेशम का रुमाल' या गाण्याच्या रिमीक्स मध्ये मोनालिसाने डान्स केला आहे. हे गाणे खुपच हिट झाले होते. मोनालिसावर चाहते फिदा झाले होते.  या गाण्याचे पुन्हा एक रिमीक्स केले गेले ज्यात बिग बॉस ओटीटी विजेती दिव्या अग्रवालने नृत्य केले आहे. हा व्हिडिओ तिने इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात तिने दोन्ही गाण्यांमधला फरक दाखवला. तिने याला कॅप्शन दिले आहे हीच मी आहे फक्त वर्ष वेगळे आहे. 

सिद्धार्थची आली आठवण 

व्हिडिओ पाहताना चाहत्यांची नजर एका चेहऱ्यावर थांबली आहे. जो चेहरा आज आपल्यात नाही. अभिनेता सिद्धार्थ शुक्लाची  झलक या गाण्यात दिसत आहे. त्याला पाहून चाहते भावूक झालेत. सिद्धार्थ शुक्ला ला जाऊन आता अनेक महिने झाले आहेत. मात्र एवढ्या जुन्या व्हिडिओत सिद्धार्थची झलक पाहून चाहते भावूक झाले. एका युझरने कमेंट केली, सिद्धार्थ सोबत तुमची जोडी किती छान दिसत आहे. तर काही युझर्सने सिद्धार्थचे नाव लिहित रडणारे इमोजी पोस्ट केले आहेत.

२ सप्टेंबर २०२१ रोजी सिद्धार्थचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. सिद्धार्थ खुपच हॅंडसम आणि चांगला अभिनेता होता. बिग बॉस १३ चा विजेताही झाला. पण अचानक काळाने त्याचा घात केला. 

Web Title: monalisa-bhojpuri-song-resham-ka-rumal-fans-rescognises-siddharth-shukla-in-the-song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.