'चीकू की मम्मी दूर की'च्या आगामी प्रोमोत दिसू शकतात मिथुन दा किंवा गोविंदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 19:08 IST2021-08-20T19:08:05+5:302021-08-20T19:08:41+5:30
'चीकू की मम्मी दूर की' या शोच्या आगामी प्रोमोमध्ये प्रतिष्ठित डिस्को डांसर 'मिथुन दा किंवा एटरनल सुपरस्टार गोविंदा' यांना सहभागी करण्याचा विचार करत आहे.

'चीकू की मम्मी दूर की'च्या आगामी प्रोमोत दिसू शकतात मिथुन दा किंवा गोविंदा
स्टार प्लसचा आगामी शो 'चीकू की मम्मी दूर की' आपल्या आकर्षक प्रोमोजसोबत आई मुलाच्या नात्याची सुंदर कहाणी सादर करून प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करत आहे. परिधि शर्मा आणि वैष्णवी प्रजापति यांच्या या शोमध्ये आई मुलाची सुंदर कहाणी दाखवण्यात आली आहे, जे एक-दूसऱ्यापासून वेगळे होतात आणि आपल्यामधल्या नृत्याच्या सामायिक धाग्याने जवळ येतात. जिथे चाहते आतुरतेने या शोची वाट पहात आहेत, स्टार प्लस आपल्या चाहतांसाठी एक मोठे सरप्राइज घेऊन सज्ज आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्टार प्लस आपल्या आगामी 'चीकू की मम्मी दूर की' या शोच्या आगामी प्रोमोमध्ये प्रतिष्ठित डिस्को डांसर 'मिथुन दा किंवा एटरनल सुपरस्टार गोविंदा' यांना सहभागी करण्याचा विचार करत आहे.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, "मिथुन दा आणि गोविंदा यांना बॉलीवुडचे डांसिंग लिजेंड मानले जातात आणि या शोमध्ये नृत्य एक महत्वपूर्ण बाजू आहे. यासाठी निर्मात्यांच्या मनात या शोच्या नव्या प्रोमोसाठी डांसिंग सुपरस्टारपेक्षा वेगळा विचार नाही आहे. मिथुन दा आणि गोविंदा यांना पडद्यावर आपल्या अनोख्या प्रतिभेसाठी ओळखले जातात आणि आम्हाला विश्वास आहे की हे एकदम मोठे काहीतरी असेल निर्माते अजूनही या दोघांच्या नावावर विचार करत आहेत मात्र, या दोघांपैकी कोणालाही ऑन-स्क्रीन पाहणे निश्चितपणे एक रोमांचक ट्रीट असेल."