गुडन्युज ! 'मेरी आशिकी तुम से ही' फेम अभिनेत्रीने दिला गोंडस मुलीला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 12:54 IST2020-04-16T12:39:23+5:302020-04-16T12:54:27+5:30

प्रेग्नंसीच्या काळातील अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते.

Meri aashiqui tum se hi actress smriti khanna blessed with baby girl gda | गुडन्युज ! 'मेरी आशिकी तुम से ही' फेम अभिनेत्रीने दिला गोंडस मुलीला जन्म

गुडन्युज ! 'मेरी आशिकी तुम से ही' फेम अभिनेत्रीने दिला गोंडस मुलीला जन्म

मेरी आशिकी तुम से ही फेम स्मृती खन्ना आई झाली आहे. तिने एक गोंडस मुलीला जन्म दिला आहे. पालक झाल्यावर स्मृती आणि पती गौतम गुप्ता खूपच उत्साही आहेत. स्मृतीने मुलीसोबतचा पहिला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत स्मृतीने बाळाला कुशीत घेतले आहे तर पती बाजूला बसलेला दिसतोय. या फोटोला सोशल मीडियवर खूपच पंसती मिळते आहे. अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये सांगितले आहे की तिच्या प्रिंसेसचा जन्म 15 एप्रिल 2020 ला झाला  आहे. सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. प्रेग्नंसीच्या काळातील अनेक फोटो तिने शेअर केलेत.


मेरी आशिकी तुम से ही या मालिका 2016च्या सुमारास संपली. या मालिकेत स्मृती खन्ना रितिका रणवीर वाघेला तर गौतम गुप्ता शर्मन मितेश पारेख ही भूमिका साकारत होते. या दोघांची ओळख या मालिकेच्या सेटवरच झाली आणि ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. ही मालिका संपली तोपर्यंत या दोघांनी लग्न करण्याचा निर्णयदेखील घेतला होता.


 स्मृतीने 2013 साली आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती. इट्स कॉम्प्लिकेटेड या शोमध्ये ती दिसली होती. यानंतर मेरी आशिकी तुम से ही, नादांनियां, ये है आशिकी, सीआयडी, बालिका वधू अशा अनेक मालिकांमध्ये ती दिसली. इस प्यार को क्या नाम दूं, या मालिकेत ती अखेरची दिसली. 2017 मध्ये ही मालिका प्रसारित झाली होती.

Web Title: Meri aashiqui tum se hi actress smriti khanna blessed with baby girl gda