मेघनाचा चांगुलपणा फक्त नाटक; निशी-नीरजला वेगळ करण्यासाठी आखणार नवा प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 17:20 IST2024-05-16T17:04:48+5:302024-05-16T17:20:11+5:30
Sara kahi tichyasathi: निशी आणि नीरज यांच्या लग्नाला मेघनाचा पूर्वीपासूनच नकार होता. मात्र, नीरज आपल्यापासून दुरावला जाऊ नये यासाठी ती निशीचा सून म्हणून स्वीकार करते.

मेघनाचा चांगुलपणा फक्त नाटक; निशी-नीरजला वेगळ करण्यासाठी आखणार नवा प्लॅन
छोट्या पडद्यावर सध्या 'सारं काही तिच्यासाठी' या मालिकेने जबरदस्त ट्रॅक पकडला आहे. त्यामुळे प्रेक्षक ही मालिका इंटरेस्ट घेऊन पाहात आहेत. मोठ्या चढउतार, स्ट्रगल केल्यानंतर निशी आणि नीरजचं लग्न झालं आहे. सुरुवातीला या लग्नाला विरोध करणारी मेघना आता त्यांच्या मुलांचं सुख पाहतांना दिसत आहे. परंतु, मेघनामुळे या मालिकेत पुन्हा एक नव्या ट्विस्ट येणार आहे.
निशी आणि नीरज यांच्या लग्नाला मेघनाचा पूर्वीपासूनच नकार होता. मात्र,मध्यंतरीच्या काळात तिच्या कटकारस्थानामुळे नीरज तिच्यापासून दुरावला होता. मात्र, त्या गोष्टीची पुनरावृत्ती नको म्हणून ती नीरज -निशीच्या लग्नाला परवानगी देते. इतकंच नाही तर हे लग्न आपल्याला मान्य असून निशीचा आनंदाने सून म्हणून स्वीकार करण्याचं नाटकही ती करते. मात्र, लग्नानंतर निशीला नीरजच्या आयुष्यातून बाहेर काढण्यासाठी ती पुन्हा नवा प्लॅन आखते.
नीरज परदेशात गेल्यानंतर निशीचा काटा काढायचा आणि मुंबईला परतण्यापूर्वीच तिला निरजच्या आयुष्यातून बाहेर काढायचा प्लॅन ती करते. मात्र, यामध्येच ओवीवर प्राणघातक हल्ला होतो आणि तिचा प्लॅन फिस्कटतो. पण आता ती हे अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करणार आहे. नीरज परत येईपर्यंत ती निशीची घरातून आणि नीरजच्या आयुष्यातून बाहेर काढण्याचा पूर्ण प्रयत्नात असणार आहे.
दरम्यान, मेघनाने हुशारीने तिचा डाव खेळायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मेघना, निशीला नीरजच्या आयुष्यातून बाहेर काढण्यात यशस्वी होईल का?, निरजसमोर पुन्हा मेघनाचं सत्य येईस का? याची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत.