High TRP Marathi Serial :अग्गंबाई सासूबाईची घसरली लोकप्रियता, ही मालिका ठरली टीआरपी रेसमध्ये अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 12:06 IST2019-12-25T11:56:33+5:302019-12-25T12:06:48+5:30
Top 5 Marathi Serials (December 2019) : अग्गंबाई सासूबाई या मालिकेची लोकप्रियता घसरली असून या मालिकेला पहिल्या पाचमध्ये देखील स्थान मिळवता आलेले नाही.

High TRP Marathi Serial :अग्गंबाई सासूबाईची घसरली लोकप्रियता, ही मालिका ठरली टीआरपी रेसमध्ये अव्वल
अग्गंबाई सासूबाई ही मालिका ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार गेल्या आठवड्यात पाचव्या क्रमांकावर होती. पण आता या मालिकेची लोकप्रियता घसरली असून या मालिकेला पहिल्या पाचमध्ये देखील स्थान मिळवता आलेले नाही.
ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार, येत्या आठवड्यात माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. अभिजीत खांडकेकर, इशा केसकर आणि अनिता दाते यांची मुख्य भूमिका असलेली माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. गेल्या आठवड्यात ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर होती. पण राधिका आणि सौमित्रचा विवाह करण्याचा निर्णय राधिकाच्या कुटुंबियांनी घेतल्यामुळे प्रेक्षक पुन्हा या मालिकेकडे वळले आहेत.
नुकतीच सुरू झालेली लग्नाची वाईफ वेडिंगची बायको ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर आहे
तर ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार, येत्या आठवड्यात चला हवा येऊ द्या सेलिब्रेटी पॅटर्न हा कार्यक्रम तिसऱ्या नंबरवर असून या कार्यक्रमाला गेल्या अनेक महिन्यांपासून प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे.
ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार, येत्या आठवड्यात स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका चौथ्या क्रमांकावर आहे. या मालिकेची कथा तर प्रेक्षकांना आवडते. पण त्याचसोबत डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली संभाजी महाराज यांची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड भावते आणि त्याचमुळे या मालिकेला प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे.
तुझ्यात जीव रंगला या मालिकेला नुकतीच तीन वर्षं पूर्ण झाली असून या मालिकेची लोकप्रियता इतक्या वर्षांत थोडी देखील कमी झालेली नाही. ही मालिका ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिल इंडियाच्या रिपोर्टनुसार पाचव्या क्रमांकावर आहे. या मालिकेत अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांची मुख्य भूमिका असून त्या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेने लीप घेतल्यानंतर तर या मालिकेची लोकप्रियता अधिकच वाढली.