नेहाच्या सांगण्यावरुन यश करणार जेसिकाशी लग्न?; मालिकेत मोठा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 14:59 IST2022-02-22T14:56:44+5:302022-02-22T14:59:26+5:30

Mazi tuzi reshimgath: जेसिका नेहाच्या घरी जाऊन तिच्याशी काही तरी चर्चा करते. ज्यानंतर नेहा घरी आलेल्या यशला जेसिकाला माफ कर आणि तिच्याशी लग्न कर असं सांगते.

mazi tuzi reshimgath yash Will marry Jessica | नेहाच्या सांगण्यावरुन यश करणार जेसिकाशी लग्न?; मालिकेत मोठा ट्विस्ट

नेहाच्या सांगण्यावरुन यश करणार जेसिकाशी लग्न?; मालिकेत मोठा ट्विस्ट

छोट्या पडद्यावरील 'माझी तुझी रेशीमगाठ'  ही मालिका सध्या रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. एकीकडे नेहा आणि यश यांच्यातील प्रेम हळूहळू वाढत असतानाच दुसरीकडे यशच्या एक्स गर्लफ्रेंडची जेसिकाची या मालिकेत एन्ट्री झाली आहे. त्यामुळे यशच्या प्रेमात पडलेली नेहा पुन्हा त्याच्यापासून दुरावणार आहे. इतकंच नाही तर यशने जेसिकाला माफ करुन पुन्हा तिच्या प्रेमाचा स्वीकार करावा अशी मागणीही नेहा यशकडे करते. त्यामुळे या मालिकेची रंगत आता दिवसेंदिवस वाढत आहे.

झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये जेसिका नेहाच्या घरी जाऊन तिच्याशी काही तरी चर्चा करते. ज्यानंतर नेहा घरी आलेल्या यशला जेसिकाला माफ कर आणि तिच्याशी लग्न कर असं सांगते. परंतु, नेहाचं हे वाक्य ऐकल्यानंतर यशला धक्का बसतो. समीर आणि त्याने मिळून केलेला प्लॅन त्याच्याच अंगाशी येतोय हे त्याच्या लक्षात येतं.

दरम्यान, नेहाचं यशवर प्रेम आहे ही गोष्ट यश, समीर आणि शेफाली या तिघांनाही माहित झाली आहे. मात्र, नेहा हे प्रेम मान्य करायला तयार नाही. त्यामुळेच समीर एक प्लॅन आखतो आणि जेसिका ही यशची एक्स गर्लफ्रेंड असल्याची बतावणी करतो. परंतु, आता नेहाने यशकडे जेसिकासोबत लग्न करण्याची मागणी केल्यामुळे या मालिकेत पुन्हा एक नवं वळण येणार असल्याचं दिसून येत आहे. आता जेसिका ही खरंच यशची गर्लफ्रेंड नाही हे सत्य नेहासमोर येणार का हे येत्या भागातच प्रेक्षकांना कळणार आहे. 

Web Title: mazi tuzi reshimgath yash Will marry Jessica