प्रार्थनाच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; खास video शेअर करत दाखवली पहिली झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 14:03 IST2022-07-10T14:02:34+5:302022-07-10T14:03:14+5:30
Prarthana behere:अलिकडेच प्रार्थनाने एक पोस्ट शेअर करत तिच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झाल्याचं सांगितलं आहे. प्रार्थना इन्स्टाग्रामवर कमालीची सक्रीय असून तिने अलिकडेच एक पोस्ट शेअर केली आहे.

प्रार्थनाच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; खास video शेअर करत दाखवली पहिली झलक
उत्तम अभिनयकौशल्य आणि सौंदर्य यांच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा मिळवणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे (prarthana behere). अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये झळकलेली प्रार्थना सध्या 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत झळकत आहे. त्यामुळे दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या प्रार्थनाचा चाहतावर्ग तुफान वाढला आहे. म्हणूनच, प्रार्थनादेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
अलिकडेच प्रार्थनाने एक पोस्ट शेअर करत तिच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झाल्याचं सांगितलं आहे.
प्रार्थना इन्स्टाग्रामवर कमालीची सक्रीय असून तिने अलिकडेच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झाल्याचं सांगितलं आहे. प्रार्थनाने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे.
प्रार्थनाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत एक लहान कुत्रा दिसत आहे. थोडक्यात हा श्वान म्हणजे तिचा नवा पाहुणा आहे. या नव्या पाहुण्यासोबत प्रार्थना मस्ती करत असून त्याच्यावर तिचं जीवापाड प्रेम असल्याचं दिसून येत आहे. "माझ्या नव्या चिमुकल्या मुलीला भेटा 'मुव्हीला'', असं कॅप्शन देत प्रार्थनाने हा व्हिडीओ शेअर केला आहे.
दरम्यान, प्रार्थनाचा हा व्हिडीओ अभिनेता भूषण प्रधानने शूट केला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून तिची ही नवीन सोबती नेटकऱ्यांना चांगलीच आवडल्याचं त्यांच्या कमेंटमधून दिसून येतंय.