काटे की टक्कर! चिमुकल्या मायराने 'ढोलिडा'वर डान्स करत आलियालाही टाकलं मागे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 15:25 IST2022-04-04T15:24:22+5:302022-04-04T15:25:19+5:30
Mayra vaikul: एवढ्या लहान वयात उत्तम अभिनय करुन मायराने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिच्या नावाची चर्चा आहे.

काटे की टक्कर! चिमुकल्या मायराने 'ढोलिडा'वर डान्स करत आलियालाही टाकलं मागे
'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून तुफान लोकप्रिय झालेली बालकलाकार म्हणजे मायरा वायकुळ. एवढ्या लहान वयात उत्तम अभिनय करुन मायराने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर तिच्या नावाची चर्चा आहे. विशेष म्हणजे मायरा बालकलाकार असण्यासोबतच एक प्रसिद्ध युट्यूबरदेखील आहे. त्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. त्यातच मायराही चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सतत सोशल मीडियावर नवनवीन पोस्ट शेअर करत असते. यात अलिकडेच तिने आलियाच्या ढोलिडा या गाण्यावर एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या मायराने इन्स्टाग्रामवर तिचा एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती 'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटातील सुपरहिट ठरलेल्या 'ढोलिडा' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. आतापर्यंत या गाण्यावर बॉलिवूडसह मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी व्हिडीओ शेअर केले. मात्र, मायराचा व्हिडीओ चर्चेत आला आहे.
या डान्ससाठी माराने रॉयल ब्ल्यू रंगाची काठापदराची साडी नेसली आहे. सोबतच तिने आलियासारखेच हुबेहूब एक्स्प्रेशन्स दिले आहेत. त्यामुळे मायरा पुढे आता आलिया फिकी पडल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे,
दरम्यान, मायरा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून अनेकदा ती सेटवरचे आणि तिच्या पर्सनल लाइफमधील फोटो शेअर करत असते. या व्हिडीओला आतापर्यंत ७६ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.