'तू चाल पुढे'मधून ईशा कोप्पीकरची छोट्या पडद्यावर एन्ट्री; सेटवरचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 18:48 IST2023-03-24T18:47:58+5:302023-03-24T18:48:42+5:30
Tu chal pudha: या मालिकेच्या माध्यमातून बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकर मराठी कलाविश्वात पदार्पण करणार आहे.

'तू चाल पुढे'मधून ईशा कोप्पीकरची छोट्या पडद्यावर एन्ट्री; सेटवरचा व्हिडीओ व्हायरल
छोट्या पडद्यावर गाजत असलेली लोकप्रिय मालिका म्हणजे 'तू चाल पुढं' (tu chal pudha). आतापर्यंत या मालिकेने तुफान लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे या मालिकेच्या प्रत्येक नव्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. यामध्येच आता एक मोठा खुलासा झाला आहे. या मालिकेच्या माध्यमातून बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकर मराठी कलाविश्वात पदार्पण करणार आहे. सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ईशा कोप्पीकर (isha koppikar)'तू चाल पुढं' या मालिकेत पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील अश्विनीने Mrs. India या स्पर्धेत सहभाग घेतला असून लवकरच या स्पर्धेचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. या फिनालेसाठी खास ईशा या मालिकेत येणार आहे.
दरम्यान, ईशा या मालिकेत Mrs. India finale मध्ये परीक्षकाची जबाबदारी पार पाडताना दिसणार आहे. त्यामुळे ईशाची या मालिकेतील एन्ट्री पाहण्यासाठी आता चाहते कमालीचे उत्सुक आहे.