Bigg bossच्या घरातील 'या' स्पर्धकांना लवकरच जावं लागणार तुरुंगात; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 19:13 IST2021-11-19T19:12:28+5:302021-11-19T19:13:20+5:30

Bigg boss marathi: हे सदस्य आज शिक्षेस पात्र ठरणार असून त्यांचे वास्तव्य जेलमध्ये असणार आहे. आणि, याचवरुन घरातील सदस्यांमध्ये चर्चा सुरु आहे.

marathi tv show bigg boss marathi new task | Bigg bossच्या घरातील 'या' स्पर्धकांना लवकरच जावं लागणार तुरुंगात; कारण...

Bigg bossच्या घरातील 'या' स्पर्धकांना लवकरच जावं लागणार तुरुंगात; कारण...

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चिला जाणारा शो म्हणजे बिग बॉस मराठी. सध्या हा शो विशेष रंगतदार वळणावर पोहोचला असून यातील प्रत्येक टास्क चर्चेत येत आहे. सध्या या घरात एक नवीन टास्क रंगत असतानाचा घरातील एका टीमला तुरुंगात जावं लागणार आहे. बिग बॉसने जाहीर केल्याप्रमाणे काही सदस्यांनी कार्य अनिर्णित कसे ठेवले जाईल या प्रयत्नात दिसले. विशेष म्हणजे हे सदस्य आज शिक्षेस पात्र ठरणार असून त्यांचे वास्तव्य जेलमध्ये असणार आहे. आणि, याचवरुन घरातील सदस्यांमध्ये चर्चा सुरु आहे.
 

शिक्षेसाठी विकास पात्र असल्याचं मला वाटतं. ते माझं नाव सांगणार हे मला माहित आहे, असं मीरा म्हणते. विशेष म्हणजे मीरानंतर गायत्रीने आणि जयने विकास शिक्षेसाठी पात्र असल्याचं जाहीर केलं. परंतु, त्यानंतर जयने त्याचं मत बदलत विकास आणि विशाल दोघंही शिक्षेस पात्र असल्याचं सांगितलं. 

दुसरीकडे, विकासने स्नेहाला विचारलं. त्यावर तिने जयचं नाव घेतलं. त्यावर कहानी मै ट्विस्ट आग या... असं विशाल म्हणाला. सोनाली आणि विशाल यांच्या मते जय हे नावं नसावं त्यामुळे त्यांनी याला नकार दिला. विकासने सांगितले मलादेखील पहिले नावं जय वाटले होते. त्यामुळे बघूया कोणात्या सदस्यांना मिळणार कारागृहाची शिक्षा ?
 

Web Title: marathi tv show bigg boss marathi new task