आशुतोषच्या प्रेमाचा स्वीकार करण्यास अरुंधतीचा नकार, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 10:54 IST2022-03-10T10:52:43+5:302022-03-10T10:54:52+5:30

Aai kuthe kay karte: आशुतोषचं आपल्यावर प्रेम असल्याचं अरुंधतीला समजतं. मात्र, या प्रेमाचा स्वीकार करण्यास ती नकार देते.

marathi tv show aai kuthe kay karte Arundhati refuses Ashutosh's love | आशुतोषच्या प्रेमाचा स्वीकार करण्यास अरुंधतीचा नकार, पण...

आशुतोषच्या प्रेमाचा स्वीकार करण्यास अरुंधतीचा नकार, पण...

'आई कुठे काय करते' या मालिकेत सध्या आशुतोष आणि अरुंधती यांच्या जीवनात अनेक चढउतार येत आहेत. काही दिवसांपूर्वीच आशुतोष देशमुख कुटुंबासमोर त्याचं अरुंधतीवर प्रेम असल्याचं मान्य करतो. यात आता यशही अरुंधती आणि आशुतोषमधील मैत्री टिकावी यासाठी प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे आशुतोषचं आपल्यावर प्रेम असल्याचं अरुंधतीला समजतं. मात्र, या प्रेमाचा स्वीकार करण्यास ती नकार देते.

कॉलेज जीवनापासून आशुतोषचं अरुंधतीवर प्रेम असतं. त्यात बऱ्याच वर्षानंतर अरुंधती त्याच्यासमोर आल्यानंतर त्याच्यातील प्रेम पुन्हा प्रफुल्लित होतं. मात्र, अरुंधतीप्रती असलेल्या सन्मानापोटी आशुतोष कधीच तिच्यासमोर प्रेम व्यक्त करत नाही. परंतु, आता त्याचं आपल्यावर प्रेम असल्याचं अरुंधतीला समजतं. इतकंच नाही तर तो देखील शेवटी तिच्यासमोर प्रेमाची कबुली देतो. यावर अरुंधती शांतपणे प्रतिक्रिया देते.

सध्या सोशल मीडियावर एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये आशुतोष त्याच्या प्रेमाची कबुली देतो. मात्र, "माझ्या मनात तसं काही नाहीये. मी आयुष्यभर अनिरुद्धवर प्रेम केलं आणि त्यांचाच विचार मी करायचे. बाकी, मैत्री, ऑफिस ,एकत्र काम याविषयी माझं काहीच म्हणणं नाही. पण, त्यापुढे मी नाही काही बोलू शकत", असं म्हणत अरुंधती आशुतोषच्या प्रेमाचा स्वीकार करण्यास नकार देते. मात्र, मैत्री कायम टिकवू असंही सांगते.
 

Web Title: marathi tv show aai kuthe kay karte Arundhati refuses Ashutosh's love