भुवनेश्वरीचं सत्य अक्षरा आणणार समोर; रागाच्या भरात अधिपती उचलणार मास्तरीन बाईंवर हात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 06:29 PM2024-01-12T18:29:10+5:302024-01-12T18:29:50+5:30

Tula Shikvin Changlach Dhada: अधिपती स्वीकारु शकेल का भुवनेश्वरीचं सत्य?

marathi tv serial Tula Shikvin Changlach Dhada adhipati bhuvaneshwari truth | भुवनेश्वरीचं सत्य अक्षरा आणणार समोर; रागाच्या भरात अधिपती उचलणार मास्तरीन बाईंवर हात

भुवनेश्वरीचं सत्य अक्षरा आणणार समोर; रागाच्या भरात अधिपती उचलणार मास्तरीन बाईंवर हात

छोट्या पडद्यावर सध्या तुफान लोकप्रिय ठरत असलेली मालिका म्हणजे 'तुला शिकवीन चांगलाच धडा' (Tula Shikvin Changlach Dhada).  ही मालिका सुरु झाल्यापासून लोकप्रिय ठरत आहे. यात खासकरुन अक्षरा आणि अधिपती यांच्यातील मैत्री विशेष लक्षवेधी ठरत आहे. एकीकडे अक्षरा सूर्यवंशी घरात शिक्षणाचं बीज रोपवण्याचा प्रयत्न करत आहे. तर, दुसरीकडे भुवनेश्वरी तिला प्रत्येक कामाता अडचणी निर्माण करत आहे. यामध्येच आता अक्षरासमोर भुवनेश्वरीचा खरा चेहरा येणार आहे.

सूर्यवंशी कुटुंबात आलेली अक्षरा या कुटुंबासोबत, त्यांच्या चालीरितींसोबत स्वत:ला जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्येच तिच्यातील शिक्षणाची ज्योत पेटती ठेवत तिच्या सासऱ्यांना बरं करतं. सासऱ्यांवर योग्य उपचार करुन अक्षरा त्यांना पूर्वीसारखं व्यवस्थित करते. ज्यामुळे ते भुवनेश्वरीचं सत्य अक्षराला सांगतात.मात्र, हेच सत्य ती अधिपतीला सांगायला जाते. मात्र, त्याचे उलटे परिणाम अक्षराला भोगावे लागतात.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अक्षरा अधिपतीला भुवनेश्वरी तुमची खरी आई नसून तुमच्या आईचं निधन झाल्याचं सांगते. इतंकच नाही तर वेळ पडली तरी भुवनेश्वरी तुमचा जीव घेईल असंही त्याला सांगते. परंतु, अक्षराचं हे बोलण ऐकून अधिपतीच्या रागाचा पारा चढतो आणि तो थेट अक्षरावर हात उचलतो.

दरम्यान, आता अधिपतीने अक्षरावर हात उचलल्यानंतर या मालिकेत पुढे काय होणार? अधिपती अक्षराचं म्हणणं ऐकून घेईल का? भुवनेश्वरीचं सत्य अधिपतीसमोर येईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावर मिळणार आहेत.

Web Title: marathi tv serial Tula Shikvin Changlach Dhada adhipati bhuvaneshwari truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.