सिद्धार्थ-आदितीच्या लग्नात तात्या अन् बयोबाई झाले रोमॅण्टिक; सोशल मीडियावर Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 18:00 IST2021-12-27T18:00:00+5:302021-12-27T18:00:00+5:30
Tujhya Majhya Sansarala Ani Kay Hava: सध्या या मालिकेत आदिती आणि सिद्धार्थ यांचा भव्यदिव्य लग्नसोहळा पार पडणार आहे. त्यामुळे घरातील प्रत्येक जण या लग्नाच्या गडबडीत आहेत.

सिद्धार्थ-आदितीच्या लग्नात तात्या अन् बयोबाई झाले रोमॅण्टिक; सोशल मीडियावर Video व्हायरल
छोट्या पडद्यावर अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' (Tujhya Majhya Sansarala Ani Kay Hava). एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित ही मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीत यशस्वी घोडदौड करताना दिसत आहे. सध्या या मालिकेत आदिती आणि सिद्धार्थ यांचा भव्यदिव्य लग्नसोहळा पार पडणार आहे. त्यामुळे घरातील प्रत्येक जण या लग्नाच्या गडबडीत आहेत. यामध्ये घरातील सर्वात ज्येष्ठ असलेलेल तात्या आणि बयोबाई मात्र एक रोमॅण्टिक गाणं शूट करण्यात रमल्याचं पाहायला मिळत आहे.
झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या मालिकेतील एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये घरातील प्रत्येक जोडपं वेगवेगळ्या मराठी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या संगीत सोहळ्याची सुरुवात तात्या आणि बयोआजीपासूनच झाली.
दरम्यान, तात्या आणि बयोबाई या दोघांनी माळ्याच्या मळ्यामंदी कोण गं उभी या गाण्यावर डान्स केला. विशेष म्हणजे या वेळी बयोबाईंचे एक्स्प्रेशन्स पाहून अनेकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.