सुख म्हणजे नक्की काय असतं: शिर्के-पाटलांच्या घराची सत्ता गौरीच्या हातात; पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 19:35 IST2021-12-10T19:35:00+5:302021-12-10T19:35:00+5:30
Sukh mhanje nakki kay asata: 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये एकेकाळी शिर्के-पाटील घरात घरकाम करणारी गौरी आज त्या घराची मालकीन होतांना दिसत आहे.

सुख म्हणजे नक्की काय असतं: शिर्के-पाटलांच्या घराची सत्ता गौरीच्या हातात; पाहा व्हिडीओ
छोट्या पडद्यावर अल्पावधीत जर कोणती मालिका लोकप्रिय झाली असेल तर ती म्हणजे 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (sukh mhanje nakki kay asata). सध्या ही मालिका अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. एकीकडे जयदीप आणि गौरीचं पुन्हा एकदा लग्न पार पडलं आहे. तर, दुसरीकडे गौरीच्या वडिलांच्या मारेकऱ्याचं सत्य समोर येणार आहे. यामध्येच आता शिर्क-पाटलांच्या घराची विस्कटलेली घडी पुन्हा सुरळीत होणार असून घरचा ताबा आता गौरीच्या हातात जाणार आहे.
'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये घरची सत्ता आता गौरीच्या हातात जाणार असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे एकेकाळी शिर्के-पाटील घरात घरकाम करणारी गौरी आज त्या घराची मालकीन होणार आहे.
जयदीप-गौरीचं लग्नानंतर घरात काही मजेशीर गेम खेळले जातात. यातील एका खेळात गौरी आणि जयदीपला पाण्यात टाकलेली अंगठी शोधायची असते. तसंच ज्याला प्रथम अंगठी सापडणार त्याचंच घरावर राज्य असणार असं जयदीपची रेणुका ताई सांगते. विशेष म्हणजे ही अंगठी गौरीला सापडते. त्यामुळे आता शिर्केपाटील कुटुंबावर गौरी राज्य करणार असं म्हणत सगळे जण जयदीपची खिल्ली उडवतात.
दरम्यान, या मालिकेत अनेक नवनवीन वळण येत आहेत. यात शिर्के-पाटलांच्या विरोधात कटकारस्थान रचणाऱ्या शालिनीचं मानसिक संतुलन बिघडल्याचं दिसून येत आहे. मात्र, शालिनी मुद्दाम असं नाटक करतीये कि खरंच तिचं मानसिक संतुलन खराब झालंय हे येत्या काही भागांमध्येच प्रेक्षकांना समजणार आहे.