'तुझ्या माझ्या संसाराला..': सिद्धार्थ- आदितीचं लग्न मोडण्याचा महालक्ष्मीचं प्लॅन होणार उघड; मालिकेत मोठा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 13:25 IST2022-03-31T13:24:35+5:302022-03-31T13:25:08+5:30

Tuzya mazya sasarala aai kay hav: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये आदिती आणि सिद्धार्थ यांचं लग्न मोडावं यासाठी महालक्ष्मीने युवराजला घरात आणलं होतं.

marathi tv serial Siddharth and aditi wedding plan Mahalakshmi's plan to break Aditi's marriage will be revealed | 'तुझ्या माझ्या संसाराला..': सिद्धार्थ- आदितीचं लग्न मोडण्याचा महालक्ष्मीचं प्लॅन होणार उघड; मालिकेत मोठा ट्विस्ट

'तुझ्या माझ्या संसाराला..': सिद्धार्थ- आदितीचं लग्न मोडण्याचा महालक्ष्मीचं प्लॅन होणार उघड; मालिकेत मोठा ट्विस्ट

छोट्या पडद्यावर सध्या विशेष गाजत असलेली मालिका म्हणजे तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं. या मालिकेतील सुरुवातीच्या काळातील अनेक भाग प्रेक्षकांना विशेष भावले. एकत्र कुटुंब पद्धती, त्यांच्यातील प्रेम हे प्रेक्षकांना प्रचंड आवडलं. मात्र, आता या मालिकेत सिद्धार्थ आणि आदिती यांच्या नात्यात चढउतार येत असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे या समस्येला आदितीची आई महालक्ष्मी जबाबदार असल्याचं आदितीच्या लक्षात येतं त्यामुळे आता ती महालक्ष्मीसोबत असलेली संबंध तोडणार असल्याचं दिसून येत आहे.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये आदिती आणि सिद्धार्थ यांचं लग्न मोडावं यासाठी महालक्ष्मीने युवराजला घरात आणलं होतं. इतकंच नाही तर युवराज आदितीचा प्रियकर असल्याचा खोटा बनावही रचला होता. ज्यामुळे सिद्धार्थ आणि आदितीमध्ये मतभेद निर्माण झाले होते. हे सत्य आता आदितीला समजणार आहे.

आदिती आणि सिद्धार्थ यांच्यातील प्रेम पाहून युवराज घडलेला प्रसंग सिद्धार्थला सांगतो. तसंच महालक्ष्मीने त्याला कशा प्रकारे वागायला सांगहितलं हेदेखील सांगितलं. त्यामुळे आदिती प्रचंड दुखावली गेली आहे. त्यामुळे ती महालक्ष्मीसोबत असलेले संबंध तोडणार आहे. इतंकच नाही तर आदितीचे वडिलदेखील महालक्ष्मीला तिच्या घरातून बाहेर काढणार आहेत. त्यामुळे आता या मालिकेत नेमकं काय वळण येणार हे येत्या भागातच प्रेक्षकांना कळणार आहे. 

Web Title: marathi tv serial Siddharth and aditi wedding plan Mahalakshmi's plan to break Aditi's marriage will be revealed