राजा-रानीच्या संसारात मीठाचा खडा; मालिकेत होणार नव्या अभिनेत्रीची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 15:50 IST2021-12-06T15:49:39+5:302021-12-06T15:50:46+5:30

Raja rani chi g jodi: सध्या सोशल मीडियावर एका तरुणीचा फोटो व्हायरल होत असून लवकरच या तरुणीची मालिकेत एन्ट्री होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

marathi tv serial raja rani chi g jodi entry new actress | राजा-रानीच्या संसारात मीठाचा खडा; मालिकेत होणार नव्या अभिनेत्रीची एन्ट्री

राजा-रानीच्या संसारात मीठाचा खडा; मालिकेत होणार नव्या अभिनेत्रीची एन्ट्री

छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे म्हणजे 'राजा रानीची गं जोडी'. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या मालिकेत मध्यंतरी अनेक रंजक वळणं आल्याचं पाहायला मिळालं. संजीवनी आणि रणजीत यांच्या संसारात बरीच वादळं येऊन गेली. मात्र, या संकट काळात दोघांनीही त्यांची साथ कधीच सोडली नाही. त्यामुळे या मालिकेसह ही जोडीदेखील विशेष लोकप्रिय होतांना दिसत आहे. आता कुठे या दोघांच्या संसारातील अडचणी दूर होत असल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र, पुन्हा एका या दोघांमध्ये संसारात मीठाचा खडा पडणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

सध्या सोशल मीडियावर एका तरुणीचा फोटो व्हायरल होत असून लवकरच या तरुणीची मालिकेत एन्ट्री होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे या मालिकेत ही तरुणी महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, तिच्या भूमिकेविषयी किंवा तिच्या नावाविषयी कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. 

सूत्रांच्या माहितीनुसार, चर्चेत येत असलेली या अभिनेत्रीमुळे संजू आणि रणजीत यांच्या आयुष्यात पुन्हा एक नवं वादळ येणार आहे. त्यामुळे आता मालिकेत पुन्हा कोणतं नवं वळण येणार? ही नवीन अभिनेत्री कोण? असे असंख्य प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. मात्र, या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना येत्या भागातच मिळणार असल्याचं दिसून येत आहे.

Web Title: marathi tv serial raja rani chi g jodi entry new actress