मुलगी झाली हो: माऊच्या भावाचा होणारा मृत्यू; मालिकेत मोठा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 12:19 IST2022-04-22T10:49:37+5:302022-04-22T12:19:45+5:30

Mulgi zali ho:सध्या सोशल मीडियावर एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये माऊच्या भावाचं म्हणजेच रोहनचा मृत्यू झाल्याचं दिसून येत आहे.

marathi tv serial mulgi zali ho new twist Mau's brother dies | मुलगी झाली हो: माऊच्या भावाचा होणारा मृत्यू; मालिकेत मोठा ट्विस्ट

मुलगी झाली हो: माऊच्या भावाचा होणारा मृत्यू; मालिकेत मोठा ट्विस्ट

छोट्या पडद्यावर दररोज असंख्य मालिकांची रेलचेल असल्याचं पाहायला मिळतं. यात काही मोजक्या मालिका आहेत ज्या अल्पावधीत लोकप्रिय झाल्या. त्यामुळे या मालिकांविषयीचे प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. यामध्येच सध्या 'मुलगी झाली हो' या मालिकेत मोठा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत माऊच्या आयुष्यात येणारे चढउतार या मालिकेत दाखवण्यात आले होते. परंतु, आता माऊसह तिच्या संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळणार आहे.

सध्या सोशल मीडियावर एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये माऊच्या भावाचा म्हणजेच रोहनचा मृत्यू झाल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे रोहनचा मृत्यू होणं हा संपूर्ण कुटुंबासाठी मोठा धक्का असून त्याचा परिणाम आर्यावर होणार आहे. आर्याला जबर मानसिक धक्का बसणार आहे. इतकंच नाही तर ती वेडी होणार असल्याचंही म्हटलं जात आहे.

दरम्यान, आतापर्यंत या मालिकेत अनेक रंजकदार वळणं पाहायला मिळाली आहेत. मात्र, रोहनच्या अकस्मात झालेल्या मृत्यूमुळे या मालिकेला नवं वळण मिळालं आहे. परंतु, या दु:खातून माऊ तिच्या कुटुंबाला सावरु शकेल का? रोहनचा मृत्यू नेमका कसा झाला? या मालिकेत पुढे काय होणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावर मिळणार आहेत.
 

Web Title: marathi tv serial mulgi zali ho new twist Mau's brother dies