चौधरींच्या घरी वाजणार सनई-चौघडे; परीने दिली यश-नेहाच्या लग्नाला परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 15:18 IST2022-03-21T15:17:04+5:302022-03-21T15:18:15+5:30

Mazi tuzi reshimgath: नेहा तिच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी त्याविषयी परीसोबत चर्चा करते. तिचं मत विचारात घेते. जर परीचा होकार असेल तरच नेहा तिच्या जीवनात पुढे वळते.

marathi tv serial mazi tuzi reshimgath Pari granted permission for Neha and Yash's wedding | चौधरींच्या घरी वाजणार सनई-चौघडे; परीने दिली यश-नेहाच्या लग्नाला परवानगी

चौधरींच्या घरी वाजणार सनई-चौघडे; परीने दिली यश-नेहाच्या लग्नाला परवानगी

गेल्या काही दिवसांपासून 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यामुळे नेहा आणि यश यांच्या नात्यात अनेक चढउतार येताना दिसत आहेत. यामध्येच आता नेहा यशच्या आजोबांची भेट घेणार आहे. त्याचबरोबर यशलादेखील परीच्या इंटरव्ह्युला सामोरं जायचं आहे.  मुळात या लग्नासाठी आजोबा तयारच आहेत. मात्र, परीची परवानगी घेणं हा मोठा टास्क नेहा-यश समोर आहे.

नेहा तिच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी त्याविषयी परीसोबत चर्चा करते. तिचं मत विचारात घेते. जर परीचा होकार असेल तरच नेहा तिच्या जीवनात पुढे वळते. आणि, याविषयी यशलादेखील ठावूक आहे. त्यामुळेच परीला इंटरव्ह्यु देण्यासाठी यश तयार होतो. विशेष म्हणजे हा इंटरव्ह्यू झाल्यानंतर परी मोठी घोषणा करते. 

सध्या सोशल मीडियावर एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये परी, यशला इंटरव्ह्यूमध्ये पास करते आणि नेहा-यशच्या लग्नाला परवानगी देते. त्यामुळे आता नेहा आणि यश यांचं लग्न थाटात पार पडणार असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, यश आणि नेहाच्या लग्नाला जरी परीने परवानगी दिली असली तरीदेखील या दोघांसमोर आणखी एक मोठं आव्हान आहे. नेहाचं यापूर्वी लग्न झालं असून तिला एक मुलगी आहे हे सत्य आजोबांना माहित नाही. त्यामुळे आजोबांसमोर हे सत्य आल्यानंतर मालिकेत कोणता नवा ट्विस्ट येणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Web Title: marathi tv serial mazi tuzi reshimgath Pari granted permission for Neha and Yash's wedding