Video: यशने स्वीकारला नेहाचा राजीनामा; मालिकेत आला मोठा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 17:46 IST2022-01-05T17:46:00+5:302022-01-05T17:46:00+5:30

Mazi tuzi reshimgath: यश नेहाचा राजीनामा स्वीकारतो. सोबतच तिला कंपनीच्या नियमानुसार, २ महिन्यांचा नोटीस पिरिअड द्यावा लागेल असं बजावून सांगतो.

marathi tv serial mazi tuzi reshimgath neha given her resign | Video: यशने स्वीकारला नेहाचा राजीनामा; मालिकेत आला मोठा ट्विस्ट

Video: यशने स्वीकारला नेहाचा राजीनामा; मालिकेत आला मोठा ट्विस्ट

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत अलिकडेच नेहाला यशचं सत्य समजलं आहे. इतके दिवस ऑफिसमधील मित्र म्हणून वावरणारा यश त्याच कंपनीचा मालक असल्याचं  तिच्या समोर आलं आहे. त्यामुळे यशने एकप्रकारे तिचा विश्वासघात केल्याचं म्हणत नेहा प्रचंड संतापली आहे. यामध्येच नेहाने एक मोठा निर्णय घेतला असून तिने यशकडे तिच्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे इतके दिवस नेहाच्या प्रेमात असलेल्या यशने तिच्या नोकरीचा राजीनामा स्वीकारलादेखील आहे. त्यामुळे या मालिकेत आता एक मोठा ट्विस्ट आला आहे.

झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये नेहा, यशला तिच्या नोकरीचा राजीनामा देताना दिसत आहे. इतकंच नाही तर यशदेखील तिचा राजीनामा स्वीकारतो. सोबतच तिला कंपनीच्या नियमानुसार, २ महिन्यांचा नोटीस पिरिअड द्यावा लागेल असं बजावून सांगतो. परंतु, यशने तिचा राजीनामा स्वीकारल्यामुळे समीर त्याच्यावर नाराज होतो. मात्र, या दोन महिन्यांमध्ये नेहाचं मन जिंकण्याचा मानस यशने केल्याचं तो सांगतो.

दरम्यान, सध्या हा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मालिकेत पुढे नेमकं काय घडणार हे पाहण्याची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. यश आणि नेहामधील हे अंतर मिटेल का? यश त्याची बाजू मांडू शकेल का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत.
 

Web Title: marathi tv serial mazi tuzi reshimgath neha given her resign