'काव्यांजली'तून सानिका काशीकरची एक्झिट; ‘ही’ अभिनेत्री साकारणार श्रेष्ठाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 20:06 IST2024-01-16T20:05:02+5:302024-01-16T20:06:19+5:30

Kavyanjali: सानिकाने ही मालिका सोडण्यापूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ सुद्धा पोस्ट केला आहे.

marathi tv serial kavyanjali apurva paranjpe entry | 'काव्यांजली'तून सानिका काशीकरची एक्झिट; ‘ही’ अभिनेत्री साकारणार श्रेष्ठाची भूमिका

'काव्यांजली'तून सानिका काशीकरची एक्झिट; ‘ही’ अभिनेत्री साकारणार श्रेष्ठाची भूमिका

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका म्हणजे 'काव्यांजली- सखी सावली'. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. त्यामुळे हे कलाकार प्रेक्षकांना आपलेसे वाटतात. या मालिकेतील काव्या आणि अंजली या बहिणींच्या जोडीवर  प्रेक्षकांनी जितकं प्रेम केलं आहे. तितकंच प्रेम सध्या श्रेष्ठाला मिळत आहे. परंतु, ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच श्रेष्ठाने या मालिकेतून काढता पाय घेतला आहे. त्यामुळे या मालिकेत आता एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे.

काव्यांजली या मालिकेत अभिनेत्री सानिका काशीकर ही श्रेष्ठाची भूमिका साकारत होती. परंतु, कामाच्या वेळा जुळत नसल्यामुळे तिने ही मालिका सोडली आहे. याविषयी तिने एक व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना माहिती दिली आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. परंतु, आता तिच्या जागी एक नवीन अभिनेत्री मालिकेत एन्ट्री करणार आहे.

सानिका ऐवजी आता या मालिकेत अभिनेत्री अपूर्वा परांजपे ही श्रेष्ठाची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे सानिकाला जितकं प्रेम प्रेक्षकांनी दिलं तितकंच प्रेम अपूर्वाला मिळेल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Web Title: marathi tv serial kavyanjali apurva paranjpe entry