'देवमाणूस' मध्ये मोठा ट्विस्ट; लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी होणार अजितकुमारचा मृत्यु

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 16:27 IST2022-02-28T16:26:42+5:302022-02-28T16:27:14+5:30

Devmanus 2: 'देवमाणूस' या मालिकेच्या पहिल्या भागापासून डॉ. अजितकुमार आणि डिंपल यांच्या लग्नाचा घाट घातला जात होता. अखेर 'देवमाणूस 2' मध्ये या दोघांचं लग्न संपन्न होणार आहे.

marathi tv serial devmanus 2 Ajit Kumar will die on the second day of the wedding | 'देवमाणूस' मध्ये मोठा ट्विस्ट; लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी होणार अजितकुमारचा मृत्यु

'देवमाणूस' मध्ये मोठा ट्विस्ट; लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी होणार अजितकुमारचा मृत्यु

छोट्या पडद्यावर गाजलेली मालिका म्हणजे 'देवमाणूस'. या मालिकेला प्रेक्षकांनी दिलेल्या अपार प्रेमानंतर या मालिकेचा पुढचा भाग 'देवमाणूस 2' देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला. देवमाणूस २ सुरु होण्यापूर्वी त्याची प्रेक्षकांमध्ये बरीच चर्चा रंगली होती. परंतु, ही मालिका सुरु झाल्यानंतर एक प्रकारे प्रेक्षकांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे ही मालिका रंजक करण्यासाठी मालिकेची टीम प्रयत्न करत आहे. यामध्येच आता या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार असल्याचं पाहायला मिळत आहे.

 'देवमाणूस' या मालिकेच्या पहिल्या भागापासून डॉ. अजितकुमार आणि डिंपल यांच्या लग्नाचा घाट घातला जात होता. अखेर 'देवमाणूस 2' मध्ये या दोघांचं लग्न संपन्न होणार आहे. मात्र, या लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी अजितकुमारसोबत एक अघटित घटना घडणार आहे.

एका पोर्टलने या मालिकेच्या पुढच्या भागात काय होणार हे सांगितलं आहे. त्यानुसार, या मालिकेत डिंपल आणि अजितकुमारचं लग्न निर्विघ्नपणे पार पडणार आहे. मात्र, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी अजित कुमारचा मृत्यु होणार आहे. त्यामुळे आता अजितकुमारचा मृत्यु नेमका कशामुळे होणार? खरंच हा मृत्यु आहे की अजितकुमारची आणखी एक खेळी हे येत्या भागातच प्रेक्षकांना कळणार आहे.

Web Title: marathi tv serial devmanus 2 Ajit Kumar will die on the second day of the wedding