अबोल प्रीतीची अजब कहाणी: अखेर राजवीर समोर येणार मयुरीचे सत्य?; मालिकेत येणार मोठा ट्विस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 13:07 IST2023-11-06T13:06:51+5:302023-11-06T13:07:08+5:30
Abol Preeteechi Ajab Kahani: भाऊसाहेब म्हणजेच मयुरी हिचं यांचं गुपित आता लवकरच राजवीरच्या समोर येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

अबोल प्रीतीची अजब कहाणी: अखेर राजवीर समोर येणार मयुरीचे सत्य?; मालिकेत येणार मोठा ट्विस्ट
काही दिवसांपूर्वीच छोट्या पडद्यावर 'अजब प्रीतीची गजब काहाणी' ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. अभिनेता अजिंक्य राऊत आणि अभिनेत्री जान्हवी तांबट यांची मुख्य भूमिका असलेली ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. इतकंच नाही तर या दोघांची जोडी प्रेक्षकांना विशेष भावली आहे. त्यामुळे या मालिकेविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक असतात. मालिकेत राजवीर आणि मयुरी यांच्या नात्यात नवनवीन ट्विस्ट येताना दिसत आहेत. परंतु, आता राजवीरसमोर भाऊसाहेब म्हणजेच मयुरीचं सत्य येणार आहे.
भाऊसाहेब म्हणजेच मयुरी हिचं यांचं गुपित आता लवकरच राजवीरच्या समोर येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मयुरीचा एक प्रेमळ मित्र तर भाऊसाहेबचा समजूतदार बॉस राजवीर हा एक सच्चा माणूस आहे. मयुरीकडे आकर्षित होणारा राजवीर आपल्या जवळच्या बॉडीगार्डला म्हणजेच भाऊसाहेबला त्याच्या मनातील प्रत्येक गोष्ट सांगतो. आणि भाऊसाहेबही त्याचं सगळं काही ऐकतो. परंतु, बॉडीगार्डचं काम करत असताना मयुरीला तिची खरी ओळख आणि तिचं प्रेम लपवावं लागतं. पण नियतीनेच आता मयुरी आणि राजवीर या दोघांना एकत्र आणलं आहे. सावकार विरुद्ध मयुरी अशी लढत आपल्याला मालिकेत सध्या पाहायला मिळत आहे. यातच राजवीर मध्यस्थी करून पुढाकार घेतो तेव्हा सावकार राजवीर वरच हल्ला करतात. हल्ल्यातून मयुरी राजवीरला वाचवते. परंतु, ताबडतोब तेथून पळ काढते.
दरम्यान, या सगळ्या प्रकारात मयुरी म्हणजेच भाऊसाहेब आहे हे सत्य राजवीर समोर येणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.