"रात्री अचानक बेशुद्ध झाले अन्...", 'तू ही रे माझा मितवा' फेम अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा; काय घडलेलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 15:53 IST2025-08-03T15:48:21+5:302025-08-03T15:53:04+5:30
Friendship Day 2025: "रात्री अचानक बेशुद्ध झाले अन्...", 'तू ही रे माझा मितवा' फेम अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्स; अशी केली मित्रांनी मदत

"रात्री अचानक बेशुद्ध झाले अन्...", 'तू ही रे माझा मितवा' फेम अभिनेत्रीने सांगितला 'तो' किस्सा; काय घडलेलं?
Sharvari Jog : मैत्री हे प्रत्येकाच्या आयुष्यातीस सुंदर असं नातं आहे. आपल्या आयुष्यात कितीही अडचणी असल्यातरी मित्र-मैत्रिणी कायम धावून येतात. मैत्री फार गरजेची असते. हे नाते इतर नात्यांपेक्षा फार वेगळे असते. या नात्यात जेवढे स्वातंत्र्य आहे तेवढे इतर कोणत्याही नात्यात नाही. आज ३ ऑगस्ट या दिवशी मैत्री दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. याचनिमित्ताने स्टार प्रवाह वाहिनीने कलाकारांचे काही खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांच्या आयुष्यातील मैत्रीच्या आठवणी शेअर करताना दिसत आहेत. अशातच 'तू ही रे माझा मितवा' फेम अभिनेत्री शर्वरी जोगने तिच्या मित्रांसंदर्भात एक किस्सा शेअर केलाय. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.
नुकताच स्टार प्रवाह वाहिनीने मैत्री दिनानिमित्त शर्वरी जोगचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यादरम्यान, अभिनेत्रीने सांगितलं की, 'माझ्यासाठी कधीही गरज लागली तरी पळत येतील असे माझे ४ मित्र आहेत. मुंबईत सध्या माझे जे मात्र मित्र आहेत ते म्हणजे, अद्वैत कडणे, ऋजुता देशमुख, आशुतोष गोखले आणि अपूर्व रांजणकर. जे कधीही माझ्या मदतीला येऊ शकतात, असं मला वाटतं."
मग पुढे अभिनेत्रीने म्हटलं, "आता परवाचाच किस्सा आहे की, मला खूप बरं नव्हतं. मी रात्री थोडीशी बेशुद्ध झाले होते. त्यावेळेला मला त्यांनी फोन केला, त्यांना कळलं की मी फोन उचलत नाही. काय झालं, हे त्यांना कळत नव्हतं. पहाटेपर्यंत ते सगळे माझ्याबरोबर होते. तीन दिवस सलग माझ्याबरोबर होते. त्यामुळे ते कधीही कुठल्याही क्षणी माझ्यासाठी येऊ शकतात, याची मला खात्री आहे." असा किस्सा शेअर करत तिच्या मनातील मैत्रीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, शर्वरी जोगच्या कामाबद्दल सांगायतचं झालं तर 'कुन्या राजाची गं तू राणी' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. या मालिकेतून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. सध्या ही अभिनेत्री 'तू ही रे माझा मितवा' मालिकेत मुख्य भूमिकेत काम करताना दिसते आहे.