अर्जुन-सायलीच्या जाळ्यात प्रिया फसणार? 'ठरलं तर मग' मध्ये 'या 'लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री, प्रोमो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 12:08 IST2026-04-12T12:04:14+5:302026-04-12T12:08:31+5:30
'ठरलं तर मग' मध्ये या लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

अर्जुन-सायलीच्या जाळ्यात प्रिया फसणार? 'ठरलं तर मग' मध्ये 'या 'लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री, प्रोमो व्हायरल
Tharla Tar Mag Serial: छोट्या पडद्यावरील 'ठरलं तर मग' ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. महाराष्ट्रातील घराघरात ही मालिका अगदी आवडीने बघितली आहे.या मालिकेचं कथानक, कलाकारांचा अभिनय तसेच त्यामध्ये येणाऱ्या ट्विस्टमुळे ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत देखील अव्वल स्थानावर असते. सध्या या मालिकेत रंजक वळण पाहायला मिळतंय. प्रियाचा खोटारडेपणा समोर आणण्यासाठी अर्जुन आणि सायलीचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, आपलं सत्य सर्वांसमोर येणार या भीतीने प्रिया मोठं कारस्थान रचते. जेलमध्ये असलेल्या महिपत आणि नागराजच्या मदतीने ती सायली-अर्जुनचा अपघात घडवून आणते. परंतु, सुदैवाने ते दोघेही यातून बचावतात. आता प्रियाचं हे खरं रुप जगासमोर आणण्यासाठी सायली आणि अर्जुनने कंबर कसली आहे.
पैशासाठी प्रिया कोणतीही थराला जाऊ शकते. यासाठी तिने नवरा अश्विनीला देखील कित्येकदा फसवते.यासाठी अर्जुन-सायली मोठा प्लॅन बनवतात. तिचा हा खोटेपणा उघड करण्यासाठी ते अधिराजची मदत घेतात. या अधिराजच्या भूमिकेतून मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्याने ठरलं तर मग मध्ये एन्ट्री घेतली आहे. तर कोण आहे हा अभिनेता? जाणून घेऊया...
दरम्यान, 'ठरलं तर मग' मालिकेत अधिराजच्या भूमिकेत अभिनेता गुरु दिवेकर दिसणार आहे. अभिनेता गुरु दिवेकरने 'ठिपक्यांची रांगोळी', 'स्वाभिमान', 'नवरी मिळे हिटलरला', 'रंग माझा वेगळा' या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.अलिकडेच तो सावळ्याची जणू सावली मालिकेत दिसला होता. आता अधिराजच्या येण्याने प्रियाचं सत्य उघड होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.