नवीन गाडी आली! टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने खरेदी केली कार, दाखवली झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 12:25 IST2025-05-28T12:22:56+5:302025-05-28T12:25:52+5:30

'उदे गं अंबे' मालिकेत झळकलेल्या अभिनेत्रीने पतीसह खरेदी केली कार, दाखवली झलक 

marathi telmarathi television actress prasiddhi kishor shared her new car video on social media | नवीन गाडी आली! टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने खरेदी केली कार, दाखवली झलक

नवीन गाडी आली! टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने खरेदी केली कार, दाखवली झलक

Prasiddhi Kishor: आपलं हक्काचं घर आणि गाडी असावी असं अनेकांचं स्वप्न असतं. यंदाच्या वर्षात मराठी कलाविश्वातील बऱ्याच कलाकारांनी घर तसेच गाडी घेत स्वप्न पूर्ण केलं आहे. गौरव मोरे, विशाखा सुभेदार, जान्हवी किल्लेकर, सावनी रवींद्र अशा बऱ्याच कलाकारांनी त्यांचं स्वप्न सत्यात उतरवलं आहे. आता या यादीत आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे. ही अभिनेत्री म्हणजे प्रसिद्धी किशोर आहे. नुकतीच अभिनेत्रीने तिच्या घरी नव्या गाडी आणली आहे. 


'आम्ही दोघी', 'नकुशी','उदे गं अंबे'  यांसारख्या मालिकांमध्ये अभिनेत्री प्रसिद्धी किशोर झळकली आहे. परंतु तिला नकुशी या मालिकेमुळे ती महाराष्ट्रात घराघरात लोकप्रिय झाली. अलिकडेच प्रसिद्धी स्टार प्रवाह वाहिनीवरील उदे गं अंबे मालिकेत राणी भागवती ही भूमिका साकारली होती.  नुकतीच अभिनेत्रीने तिच्या पतीसह गाडी खरेदी करुन चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. पतीच्या वाढदिवशी तिच्या घरी नव्या गाडीचं आगमन झालं आहे. दरम्यान, या व्हिडीओमध्ये अभिनेत्री तिच्या संपूर्ण कुटुंबासह गाडी खरेदी करण्यासाठी गेली आहे. तसंच आपल्या नव्या गाडीची झलक तिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दाखवली आहे. 

सध्या संपूर्ण कलाविश्वातून अभिनेत्री प्रसिद्धी किशोर आणि तिच्या पतीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. देवदत्त नागे, अश्विनी कासार तसेच रुपल नंद, ऋतुजा बागवे यांसाराख्य कलाकारांनी अभिनेत्रीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर कमेंट्स करत तिला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. 

Web Title: marathi telmarathi television actress prasiddhi kishor shared her new car video on social media