"तू लग्न कधी करणार?" चाहत्याच्या प्रश्नावर अपूर्वा नेमळेकरने दिलं 'हे' भन्नाट उत्तर, दुसऱ्या लग्नाबद्दल म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 11:48 IST2025-09-02T11:42:59+5:302025-09-02T11:48:53+5:30

"तू लग्न कधी करणार?" अपू्र्वा नेमळेकरला चाहत्याचा प्रश्न, म्हणाली- "मी अजूनही..."

marathi television premachi goshta fame apurva nemlekar answer fans question about marriage says | "तू लग्न कधी करणार?" चाहत्याच्या प्रश्नावर अपूर्वा नेमळेकरने दिलं 'हे' भन्नाट उत्तर, दुसऱ्या लग्नाबद्दल म्हणाली...

"तू लग्न कधी करणार?" चाहत्याच्या प्रश्नावर अपूर्वा नेमळेकरने दिलं 'हे' भन्नाट उत्तर, दुसऱ्या लग्नाबद्दल म्हणाली...

Apurva Nemlekar: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. 'रात्रीस खेळ चाले' मालिकेत शेवंता नावाचं पात्र साकारून तिने प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली. तसंच बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातही ती सहभागी झाली होती. तिने आजवर साकारलेली प्रत्येक भूमिका विशेष गाजली. अलिकडेच अपूर्वा नेमळेकर स्टार प्रवाह वाहिनीवरील 'प्रेमाची गोष्ट'मालिकेत झळकली. ही मालिका जरी संपली असली तरी अपूर्वा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर आस्क मी सेशन घेतलं होतं. यादरम्यान तिने अगदी दिलखुलासपणे अनेक प्रश्नांची उत्तर दिलं. यामध्ये अगदी दैनंदिन जीवनातील गोष्टींपर्यंत आणि प्रोजेक्टपासून अनेक गोष्टींबद्दलचे प्रश्न होते.त्यामध्ये अपूर्वाने लग्नाबद्दल भाष्य केलं आहे.

अपूर्वा नेमळकरला आस्क मी सेशनमध्ये एका चाहत्याने तू लग्न कधी करणार? असा प्रश्न विचारला. ज्याचं अभिनेत्रीनं दिलेलं उत्तर पाहून सगळ्यांच्या लक्ष तिच्याकडे गेलं आहे. या सेशनमध्ये चाहत्याच्या या प्रश्नाला अगदी स्पष्ट शब्दांत उत्तर देत अभिनेत्री म्हणाली, "Guys,मी तर कधीपासून  तयार आहे पण नवरा मुलगा जीपीएसवर हरवला आहे असं दिसतंय, तरीही मी वाट पाहते आहे... असं अभिनेत्रीने म्हटलं आहे. 

दरम्यान, करिअरच्या शिखरावर असताना अपूर्वाचं लग्न झालं होतं. मात्र काही कारणांमुळे तिचा घटस्फोट झाला. अपूर्वा सध्या सिंगल आहे. अर्थात तिचं आधी लग्न झालेलं आहे. 2014 मध्ये तिने रोहन देशपांडेसोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही.मात्र,आता अपूर्वाने पुन्हा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

Web Title: marathi television premachi goshta fame apurva nemlekar answer fans question about marriage says

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.