आ रंग दे दुपट्टा...! करीना कपूरच्या सुपरहिट गाण्यावर योगिता चव्हाणचा जबरदस्त डान्स; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 15:55 IST2025-04-29T15:52:36+5:302025-04-29T15:55:35+5:30

करीना कपूरच्या सुपरहिट गाण्यावर योगिता चव्हाणचा जबरदस्त डान्स; एनर्जी पाहून थक्क व्हाल

marathi television actress yogita chavan amazing dance on kareena kapoor superhit song video viral | आ रंग दे दुपट्टा...! करीना कपूरच्या सुपरहिट गाण्यावर योगिता चव्हाणचा जबरदस्त डान्स; व्हिडीओ व्हायरल

आ रंग दे दुपट्टा...! करीना कपूरच्या सुपरहिट गाण्यावर योगिता चव्हाणचा जबरदस्त डान्स; व्हिडीओ व्हायरल

Yogita Chavan : 'जीव माझा गुंतला' या मालिकेमुळे अभिनेत्री योगिता चव्हाण घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने साकारलेली अंतरा प्रेक्षकांना भावली.त्यानंतर बिग बॉस मराठीच्या पर्वातही ती झळकली होती. परंतु,अगदी काही आठड्यातच ती घराबाहेर पडली. दरम्यान, योगिता चव्हाण तिच्या कामासह सोशल मीडियावरील फोटो, व्हिडीओमुळे कामय चर्चेत येते. नुकताच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओची सगळीकडे तुफान चर्चा आहे. 


योगिता चव्हाण तिच्या डान्स व्हिडीओमुळे अनेकदा चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. नुकताच सोशल मीडियावर योगिताने डान्स करतानाचा भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे. करीना कपूरच्या 'मुझे कुछ कहना है' या चित्रपटातील 'आ रंग दे दुपट्टा' या गाजलेल्या गाण्यावर तिने डान्स केला आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्रीच्या डान्स स्टेप्स आणि हावभाव पाहून नेटकऱ्यांनी तिचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. योगिताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

दरम्यान, योगिताच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी तुफान लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. या व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया देत एका नेटकऱ्याने लिहिलंय की, "एकच नंबर, एकदम कड़क...", अशी कमेंट केली आहे. तर आणखी एका यूजरने म्हटलंय, "तुझा डान्स छान आहे...". 

Web Title: marathi television actress yogita chavan amazing dance on kareena kapoor superhit song video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.