"आईने मालिका बघणं बंद केलं, कारण ...", 'ठरलं तर मग' मधील भूमिकेमुळे प्रियांकाच्या पालकांना आला 'असा' अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 13:03 IST2025-12-08T12:57:41+5:302025-12-08T13:03:01+5:30
"त्यामुळे आईने मालिका बघणं बंद केलं...",'ठरलं तर मग' मधील प्रियाचं वक्तव्य, म्हणाली- "लोकांनी भयंकर..."

"आईने मालिका बघणं बंद केलं, कारण ...", 'ठरलं तर मग' मधील भूमिकेमुळे प्रियांकाच्या पालकांना आला 'असा' अनुभव
Priyanka Tendolkar: 'ठरलं तर मग' ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक पाहिली जाणारी आणि लोकप्रिय असलेली मालिका आहे. या मालिकेचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. सुभेदारांच्या घरातील प्रत्येक पात्र आता घराघरांत लोकप्रिय झालं आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेत प्रिया ही खलनायिकेची भूमिका अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर साकारत आहे. प्रियांकाचं या मालिकेतील काम पाहून अनेकजण तिचं कौतुक करतात. मात्र, प्रियाची आई त्यांच्या लेकीची ही मालिका पाहत नाहीत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी यामागचं कारण सांगितलं आहे.
अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर आणि तिच्या आईने नुकतीच 'अल्ट्रा बझ' मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये निगेटिव्ह भूमिकेमुळे अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो,यावर काय वाटतं, असा प्रश्न अभिनेत्री आणि तिच्या आईला विचारला गेला. त्यावर स्वत: प्रियांका उत्तर देत म्हणाली," पहिलं म्हणजे माझी आई युट्यूबवर सक्रिय आहे. ती या आधी मालिका खूप एन्जॉय करायची. तिला माझे,नागराजचे आणि महिपतचे सीन्स खूप आवडतात. आई-बाबा ते सीन्स पाहून हसत असतात. पण,ती जेव्हा युट्यूबवर मालिकेचे काही व्हिडिओ,शॉर्ट्स वगैरे पाहत असते. त्या व्हिडिओमध्ये कमेंट सेक्शनला लोकांनी भयंकर ट्रोलिंग केलेले असतं. ते वाचल्यानंतर तिला प्रचंड त्रास होता.या सगळ्या कमेंट्स वाचून माझ्या आईने सिरीयल बघणं बंद केलं आहे. यासाठी नाही की तिला माझी मालिका बघण्यात रस नाही. पण, हे ट्रोलिंग ती पर्सनली घ्यायला लागली. "
दरम्यान, प्रियांका तिच्या आईला खास सल्ला देत म्हणाली,"ट्रोलिंग ही गोष्ट तू कधीच पर्सनली घेऊ नको. ज्यांच्याकडे काम असतं त्यांना हे सगळं करायला अजिबात वेळ नसतो. त्यामुळे ट्रोल करतात ते खूप रिकामी असतात. त्यामुळे त्यांना करू देत ट्रोल."
माझ्या आई-बाबांना सुद्धा त्रास होतो...
"ट्रोलिंग करणं हे एक वेळ ठीक आहे पण जेव्हा पर्सनल ट्रोलिंग करता ते खूप वाईट असतं. पण, एक-दोन कमेंट अशा होत्या की जेव्हा मालिकेत प्रिया तिची आई प्रतिमाला त्रास देते. तेव्हा मला काही कमेंट्स आल्या, मेसेज आले की ही तिच्या आईसोबत सुद्धा अशीच वागत असेल, ही तिच्या आईची सुद्धा होऊ शकत नाही.या गोष्टी मी डील करू शकते कारण मी या क्षेत्रात आहे आणि मी या सगळ्या गोष्टीची तयारी करूनच आली आहे. पण माझे आई-वडील हे सामान्य नागरिक आहेत. तुम्ही जेव्हा पर्सनल कमेंट करता तेव्हा ते दुखावले जातात. माझ्या बाबांना आणि आईला सुद्धा त्रास होतो. माझं म्हणणं इतकंच आहे की, तुम्ही कामाविषयी बोला. मी एक प्रियांका म्हणून समाजात वावरते ती वेगळी आहे. आणि मालिकेतील प्रिया वेगळी आहे. पण, लोकांना हे कळत नाही. "