VIDEO: अभिनेत्री खुशबू तावडेच्या लेकीचं बारसं; आत्याने कानात सांगितलं नाव! साधेपणाचं होतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 11:15 IST2024-10-24T11:10:29+5:302024-10-24T11:15:20+5:30

'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेत्री खुशबू तावडेच्या (Khusboo Tawde) घरी लक्ष्मीचं आगमन झालं आहे.

marathi television actress sara kahi tichyasathi fame khushboo tawde baby girl naming ceremony | VIDEO: अभिनेत्री खुशबू तावडेच्या लेकीचं बारसं; आत्याने कानात सांगितलं नाव! साधेपणाचं होतंय कौतुक

VIDEO: अभिनेत्री खुशबू तावडेच्या लेकीचं बारसं; आत्याने कानात सांगितलं नाव! साधेपणाचं होतंय कौतुक

Khushboo Tawde : 'सारं काही तिच्यासाठी' फेम अभिनेत्री खुशबू तावडेच्या (Khushboo Tawde) घरी लक्ष्मीचं आगमन झालं आहे. अभिनेत्री खुशबू तावडे (Khushaboo Tawde) आणि अभिनेता संग्राम साळवी (Sangram Salvi) मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडपे आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली खुशबू आणि संग्राम दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. खुशबूने तिच्या लाडक्या लेकीचं नाव सोशल मीडियावर पोस्ट करत जाहीर केलं होतं. 'राधी' असं त्यांच्या मुलीचं नाव आहे. खुशबू तावडेने तिच्या इन्स्टाग्रामवरुन फॅमिली फोटो शेअर केला आहे. यामध्ये फोटोमध्ये तिने लेकीची झलक दाखवली होती.


नुकतंच खुशबूच्या लेकीचं बारसं पार पडलं. या बारशाचा व्हिडीओ अभिनेत्री तितिक्षा तावडेनेसोशल मीडियावर  शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये अगदी साधेपणाने घराची सजावट केलेली पाहायला मिळते. खुशबु-संग्रामच्या लेकीच्या बारश्याला त्यांच्या कुटुंबातील माणसं, नातेवाईक उपस्थित असलेले पाहायला मिळत आहेत. व्हिडीओ मावशी तितिक्षा लाडक्या भाचीला पाळण्यात घालताना दिसते आहे. राधीच्या येण्याने तितिक्षाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी खुशबू तावडे तसेच संग्राम साळवीला शुभेच्छा दिल्या आहेत. 

२०१८ साली खुशबू आणि संग्रामने बांधली लग्नगाठ

अभिनेत्री खुशबू तावडे आणि अभिनेता संग्राम साळवी हे मराठी सिनेइंडस्ट्रीतील एक लोकप्रिय जोडपे आहे. त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. त्या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. २०१८ साली ते विवाहबंधनात अडकले. तर त्यांना नोव्हेंबर २०२१ मध्ये पहिला मुलगा झाला. त्यांच्या या तीन वर्षीय मुलाचे नाव राघव आहे.  

Web Title: marathi television actress sara kahi tichyasathi fame khushboo tawde baby girl naming ceremony